नितिन श्रीवास राज्यस्तरीय गुणिजन गुरूगौरव पुरस्काराने सन्मानित  स्थानिक स्कुल ऑफ स्कॉलर्स येथे इंग्रजी शिक्षक म्हणून कार्यरत

0
50
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे

स्थानिक स्कुल ऑफ स्कॉलर्स, धामणगाव रेल्वे येथील इंग्रजी शिक्षक श्री. नितीन लखनजी श्रीवास यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्था, मुंबई तर्फे राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंम्मेलन २०२४ च्या राज्य स्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे महत्वपूर्ण योगदान लक्षात घेऊन व त्यांनी केलेल्या अभूतपूर्व शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या कार्य प्रोफाइलची नामांकन आणि पडताळणी प्रक्रियेनंतर त्यांना हा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. स्थानिक आरोही रिसॉर्ट येथे आयोजित भव्य सत्कार समारंभात भाजपा ज्येष्ठ नेते व माजी आमदार आदरणीय श्री अरुणभाऊ अडसड यांच्या हस्ते व डॉ सौ.अर्चनाताई रोठे, रावसाहेब रोठे, रविशभाऊ बिरे, सुरेशभाऊ पोळ, ऋषिकेश जगताप व अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत नितीन श्रीवास यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, गौरव पदक, मानपत्र, मानाचा फेटा, मानकरी बॅच व महावस्त्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच अलीकडे नितीन श्रीवास यांना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोग, नवी दिल्ली तर्फे देखील आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठित उत्कृष्ट अध्यापन पुरस्कार २०२४ ने सुद्धा सन्मानित करण्यात आले आहे हे विशेष. शाळेच्या मुख्याध्यापिका के.साई नीरजा, पर्यवेक्षिका शबाना खान, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी त्यांचे मनापासून स्वागत व अभिनंदन केले आहे.

veer nayak

Google Ad