आर्वी, प्रतिनिधी /पंकज गोडबोले
आर्वी : रेड क्रॉस सोसायटी तसेच नगरपरिषद गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आर्वी तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक नगरपरिषद विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय म्हणजेच गांधी विद्यालयाच्या भव्य प्रांगणामध्ये दिनांक 21 जून सकाळी 6 वाजून 30 मिनिटा पासून ते 8.00वाजेपर्यंत भव्य योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये रेड क्रॉस सोसायटी आर्वी चे संस्थापक अध्यक्ष प्रसिद्ध हृद्य रोग तज्ञ डॉक्टर अरुण पावडे तसेच आर्वी परिसरातील अनेक नामवंत डॉक्टर्स,विधान परिषदेचे आमदार माननीय श्री दादाराव जी केचे ,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होते .
यापूर्वी दिनांक 17 जून आणि 19 जून असे दोन दिवस एनसीसी छत्रसैनिकांचे सराव सत्र घेण्यात आले आणि 21 जूनला सुद्धा एनसीसी छात्र सैनिक मोठ्या 5 उपस्थित होते आणि अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांनी सर्व योग साधना केली.
योग प्रशिक्षक श्रीकांत कलोडे सर त्यांचे सहाय्यक दिपाली मॅडम आणि एनसीसी अधिकारी प्रमोद नागरे या तिघांचेही विद्यालयाच्या वतीने प्राचार्य पाळणे सर आणि डॉक्टर अरुण पावडे यांनी शाल श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार केला. प्रशिक्षकांनी सर्व योग प्राणायाम तसेच विविध आसनांचा अभ्यास घेऊन त्याचे महत्त्व आपल्या जीवनात कसे आहे हे सर्वांना पटवून दिले आणि योगा एक दिवस न करता 365 दिवस जर केला तर त्याचा आपल्या मनावर आणि शरीरावर उत्कृष्टपणे परिणाम होऊन आपले जीवन संपन्न होणार असे प्रतिपादन योग प्रशिक्षक यांनी केले
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेड क्रॉस सोसायटी आर्वी चे सर्व सदस्य गांधी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक नितीन बोडखे यांनी तर आभार प्रदर्शन डॉक्टर अभिलाष धरमठोक यांनी केले