आर. के ज्ञान मंदिरम येथे नवरात्रोत्सव विद्यार्थीनींनी साकारले नवदुर्गा चे रूप

0
42
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

पुलगाव

स्थानिक आर. के ज्ञान मंदिरम येथे नवरात्रोत्सव व दसरा मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम एकत्रितपणे सांस्कृतिक उत्साह साजरा करण्यासाठी आणि देवी माँ दुर्गाचा आशीर्वाद घेण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी विद्यार्थीनींनी नवदुर्गा चे रूप साकारले होते जे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी राम, सीता, लक्ष्मण, हनुमान, व नवदुर्गा असे विविध वेषभूषा केल्या होत्या. शारदीय नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने शाळेचे प्राचार्य नितीन श्रीवास, पर्यवेक्षिका प्रणिता कोंबे व सर्व शिक्षक वृंदानी विद्येची आराध्य देवता माता सरस्वती चे पूजन करून विधिवत आरती केली. प्राचार्य नितीन श्रीवास व पर्यवेक्षिका प्रणिता कोंबे यांनी नऊ कन्यांचे पूजन करून त्यांना भेटवस्तू दिल्या. या नवोदित व अनोख्या उपक्रमाचे सर्व पालक वृंदानी कौतुक केले आहे. हा उपक्रमाचे आयोजन शाळेचे प्राचार्य नितीन श्रीवास व पर्यवेक्षिका प्रणिता कोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

veer nayak

Google Ad