धामणगाव रेल्वे प्रतिनिधी
राज्य शासन व केंद्र शासनाचे समन्वयाने विविध विद्यापीठांमध्ये व त्यांना संलग्नित विविध महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे नियमित व विशेष शिबिराद्वारे विविध समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात येतात. यामध्ये थोर पुढाऱ्यांची जयंती व पुण्यतिथी कार्यक्रम, श्रमदान अंतर्गत विविध उपक्रम, शेतकरी मार्गदर्शन व प्रशिक्षण उपक्रम, ग्राम स्वच्छता अभियान, रक्त तपासणी रक्तदान शिबिरचे आयोजन, आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन, नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन, गाजर गवत निर्मूलन व जन जागृती कार्यक्रम, वृक्ष लागवड व संगोपन कार्यक्रम, मृद व जलसंवर्धन विषयक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध विषयांवरील बौद्धिक सत्र चे आयोजन, लैंगिक व एड्स संदर्भात जनजागृती, सायबर क्राईम संदर्भातील मार्गदर्शन, विविध क्रीडा व इतर स्पर्धांचे आयोजन, विविध विशेष दिवस्कर्यक्रम. विविध जनजागृती रॅली, इत्यादी अनेक समाजोपयोगी उपक्रम आयोजित करण्यात येतात. व सांघिक प्रयत्नाने सामाजिक विकासाचे कार्य पूर्ण केले जाते. राष्ट्रीय सेवा योजनेमधून स्वयंसेवकांचा बौद्धिक विकास, व्यक्तिमत्व विकास, शारीरिक विकास, मानसिक विकास, नेतृत्व विकास, कौशल्य विकास, चारित्र विकास, साधण्यास मदत होते. निस्वार्थी सेवाभावनेने काहीही अपेक्षा न ठेवता इतरांचे कल्याण करणे व माणसाला माणसाप्रमाणे वागवणे या उद्देशाने प्रत्येक स्वयंसेवकांनी अष्टप्रहर प्रामाणिकपणे हे कार्य करणे अपेक्षित आहे. समाजसेवेच्या माध्यमातून शिक्षा प्राप्त करणे हा राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्देश आहे. प्रत्येक राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी उद्देश्य प्रमाणे स्वतःपेक्षा आपल्या समूहाला व समाजाला महत्त्व देणे गरजेचे आहे. समाजात राहून त्यांच्या गरजा शोधणे व त्यांना सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे प्रत्येक स्वयंसेवकाचे आद्य कर्तव्य आहे. 24सप्टेंबर 1969 हा दिवस राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन म्हणून साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय सेवा योजना मानवसेवेचे समाजसेवेचे राष्ट्रसेवेचे एक प्रभावी माध्यम आहे. राष्ट्रीय सेवा योजनेमुळे मानवी जीवनात सकारात्मक परिणाम होतात. संस्कार संस्कारक्षम पिढी घडविली जाते. माणुसकी निर्माण केल्या जाते. तसेच माणुसकी जपली जाते. परस्परांमध्ये नातेसंबंध निर्माण होत आहे. उपलब्ध संसाधनांमध्ये कसे कार्य करायचे यासंदर्भात स्वयंसेवकांमध्ये जाणीव निर्माण होते. मानवी स्वभावात सदगुणांची रेलचेल वाढते. व सद्गुण युक्त विचारांमुळे सशक्त भारत निर्मिती स चांलना मिळत आहे. चला तर सर्व राष्ट्रीय सेवा योजना पथकातील सर्व कार्यक्रम समन्वयक, कार्यक्रम अधिकारी, व स्वयंसेवक यांनी एकत्र कार्य करून राष्ट्रीय सेवा योजना लक्ष गीताप्रमाणे उन्नत, विकसित व संस्कार क्षम भारत बनविण्याचे स्वप्न साकारू या.जय हिंद जय भारत .