धामणगाव रेल्वे
श्री दत्ताजी मेघे बालकल्याण शिक्षण संस्था द्वारा संचालित स्कूल ऑफ स्कॉलर्स कब्स द्वारा विज्ञान दिवस साजरा करण्यात आला आणि त्या दिवसाचे निमित्य साधून विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले .या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी श्री पाटील सर होते. त्याचे स्वागत शाळेच्या पर्यवेक्षिका शबाना खान यांनी केले .त्यानी मुलांना राष्ट्रीय विज्ञान दिवस का साजरा करतात या बद्दल मार्गदर्शन केले .काही मुले वैज्ञानिक यांच्या वेशभूषेत आले होते .मुलांनी छान मॉडेल्स बनवून आणले होते व त्यानी छान प्रकारे ते मॉडेल सादरीकरण केले. विज्ञान प्रदर्शन पाहण्याकरिता पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. अश्या प्रकारे मुलांचे खूप कौतुक करण्यात आले .
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्राचार्या के साई नीरजा व पर्यवेक्षिका शबाना खान तसेच प्रणिता जोशी ,रेणुका सबाने,वर्षा देशमुख ,वृषाली काळे,आकांशा महल्ले , राणी रावेकर, हर्षदा ठाकरे , प्राजक्ता दारुंडे यांनी अथक प्रयत्न केले .