नॅशनल लेव्हल अबॅकस कॉम्पीटीशन परिक्षेत चांदूर रेल्वेच्या विदयार्थ्यांनी मारली बाजी. १० व्या नॅशनल लेव्हल अबँकस कॉम्पीटीशन परिक्षेत १६ पैकी १६ विदयार्थी उत्तीर्ण

0
15
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदूर रेल्वे.

 बिर्ला ओपन माईड इंटरनॅशनल स्कुल, अमरावती येथे नुकत्याच झालेल्या नॅशनल लेव्हल अबॅकस कॉम्पीटीशन २०२४ चे आयोजन करण्यात आले होते, या परिक्षेकरीता संपूर्ण विदर्भातून सुमारे २५०० विद्यार्थ्यांनी परिक्षेत सहभाग नोंदविला होता. ही स्पर्धा दोन टप्यात घेण्यात आली होती २१ डिसेंबर २०२४ ऑनलाईन पध्दतीने परिक्षेचे आयोजन केले गेले. यामध्ये भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगभरातुन विदयार्थ्यांनी सहभाग घेतला होता. दि २२ डिसेंबर २०२४ रोजी आफलाईन परिक्षेचे आयोजन अमरावती येथील बिर्ला ओपन माईड इंटरनॅशनल स्कुल मध्ये करण्यात आले होते, यामध्ये सुध्दा महाराष्टातील सर्व जिल्ह्यातील मुलांनी सहभाग घेतला होता, यामध्ये चांदूर रेल्वे तालुक्यातील वर्ग १ ते ८ च्या एकूण १६ विदयार्थ्यांनी सहभाग घेतला होता, यामध्ये ८ मिनीटात गणिताचे १०० प्रश्नांचे उत्तरे सोडवावी लागतात, या स्पर्धेमध्ये चांदूर रेल्वे येथील ब्रेन पॉवर अॅकेडमीच्या विवीध शाळेतील २ विदयार्थ्यांनी ग्रॅड मास्टर श्रेणीमध्ये, ५ विदयार्थ्यांनी प्रथम श्रेणीमध्ये, ५ विदयार्थ्यानी दुतीय श्रेणीमध्ये, ४ विदयार्थ्यांनी तृतीय श्रेणीमध्ये येवून चांदुर रेल्वे तालुक्याचे नाव उज्वल केले, यामध्ये  ग्रॅड मास्टर श्रेणीमध्ये  येण्याचा मान  कु हर्षदा राजीव शिवणकर, बापुसाहेब देशमुख हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयीन, चां, रे, व वेद संजय धुर्वे, स्कुल ऑफ स्कॉलर्स, धा, रे, प्रथम श्रेणीत येण्याचा मान हर्षल दिनेश राठोड, जिंगल बेल स्कुल, चां, रे, रुद्रांश अविनाश ठाकरे राजर्षी झाडु शाळा, चां, रे, कु. साव्या स्वप्नील चव्हाण, जिंगल बेल स्कुल, चां, रे कु. इशिका संजय इंगोले,, बापुसाहेब देशमुख शाळा, चां, रे, सुहानी सुनील उईके, जिंगल बेल स्कुल, चां, रे दुतीय श्रेणीत येण्याचा मान उज्वल दिनेश राठोड, राजर्षी शाहु शाळा, चां, रे भुमी विजय मनोहर, लिटील स्टार, कु. मृण्ययी अविनाश ठाकरे, विद्यानिकेतन स्कुल, धामणगाव रेल्वे, स्वर संतोष जगताप, बापुसाहेब देशमुख शाळा, चां, रे, त्रिशुल प्रदीप लाडे, विद्यानिकेतन स्कुल, धामणगाव रेल्वे, तृतीय श्रेणीत येण्याचा मान अश्नवेश विनोद तिजारे, अवनी आशीष शिरभाते जिंगल बेल स्कुल, चां, रे गौरी सुनील चामटकर, विद्यानिकेतन स्कुल, धामणगाव रेल्वे, माहीका सुधीर काळमेघ राजर्षी शाहु शाळा, चां, रे यांनी पटकावला,

या सर्व विद्यार्थीनी आपल्या वैदीक गणिताच्या तल्लक बुध्दीच्या जोरावर यश संपादन केले. सर्व मुले आपल्या यशाचे श्रेय आपले आई वडील व ब्रेन पॉवर किडमीच्या संचालिका सौ शिल्पा अविनाश ठाकरे व आपल्या शाळांना देतात. अबॅकस शिकल्याने मुलांच्या मनातून, गणिताविषयीची भीती दूर होण्यास व त्यांची स्मरणशक्ती, बुध्दीमत्ता व आत्मविश्वास वाढण्यास मदत होते, नेहमीच्या पध्दतीपेक्षा शंभर पट जलद गतीने बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार सोडविता येते. म्हणून चांदूर रेल्वे शहरातील जास्तीत जास्त विद्यार्थीनी अबॅकस, वैदीक गणित पध्दती शिकावी असे आवाहन ब्रेन पॉवर किडमीच्या शिक्षीका शिल्पा अविनाश ठाकरे यांनी केले.

veer nayak

Google Ad