धामणगाव रेल्वे –
मा. श्री दत्ताजी मेघे बालकल्याण शिक्षण संस्था द्वारा संचालित एस ओ एस कब्स येथे राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करण्यात आला. दरवर्षी राष्ट्रीय हातमाग दिवस ७ ऑगस्ट रोजी संपुर्ण भारतात साजरा केला जातो.प्री प्रायमरी हेड माननीय शबाना खान मॅडम आणि शिक्षिका प्रणिता जोशी मॅडम यांनी हातमाग हे भारतातील सर्वांत मोठे क्षेत्र आहे आणि चरख्याचा उपयोग करून कसे सुत काढून खादी कापड तयार केले जातात तसेच हातमाग कारागीर कापूस, रेशीम पासून कसे सुंदर कपडे तयार करतात याविषयी माहिती दिली. राष्ट्रीय हातमाग दिना निमित्त शाळेत वेगवेगळया प्रकारचे उपक्रम आयोजित करण्यात आले होते. .शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय प्रचिती धर्माधिकारी मॅडम आणि प्री प्रायमरी हेड मा. शबाना खान मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमच्या यशस्वीतेकरिता प्रणिता जोशी, रेणुका सबाने, वर्षा देशमुख, आकांक्षा महल्ले, राणी रावेकर, प्राजक्ता दारूंडे श्रध्दा राॅय, आश्विनी नांदणे यांचे सहकार्य लाभले.