चांदुर रेल्वे (ता. प्र.)-
धामणगाव,नादगाव खडेश्वर,चांदूर रेल्वे तिनही तालुक्यातून नमो चषक अंतर्गत झालेल्या महिला भजन मंडळाच्या स्पर्धेच्या माध्यमातून आज सोमवार १२ फेब्रुवारी ला रॉयल पॅलेस मंगल कार्यालयात निशिगंधा वाड यांच्या उपस्थितीत अंतीम १७ भजन मंडळाच्या महिलेच्या चमूनी भजनाची प्रस्तुती केली या स्पर्धेत विजयी मंडळाला बक्षिस वितरण करण्यात आले यावेळी भाजपा आमदार प्रताप अडसड,माजी आमदार अरूण अडसड,अर्चना रोंठे मंचावर उपस्थित होते.
धामणगाव विधानसभा मतदारसंघातील नादगाव खडेश्वर, धामणगाव चांदूर रेल्वे तालुक्यात ३५० च्यावर महिला भजन मंडळाच्या स्पर्धकानी नाचु किर्तनाच्या रंगी नमो चषक महिला भजन स्पर्धेत सहभाग दर्शविली या मध्ये अंतिम फेरी करीता तिनही तालुक्यातून १७ भजन मंडळाची अंतिम फेरी करीता निवड करण्यात आली या भजन मंडळीने चांदूर रेल्वे रॉयल पॅलेस मध्ये झालेल्या.
अंतिम फेरीत उपस्थित भजन मंडळीने प्रभु श्रीराम,कृष्ण,अंबादेवी,विठ्ठोबा रुक्मिणी सह गवळणी प्रस्तुत केली या भजन स्पर्धेत नागपूर येथील आमंत्रित परीक्षक गायिका निशा वाघ व विशाखा मंगदे यांनी अचूक निरिक्षण करत विजयी मानकरी भजन संघ निवडुन क्रमांक घोषित करत बक्षिस वितरण केले यावेळी माजी आमदार अरूण अडसड व अर्चना रोठो तसेच निशिगंधा वाड यांनी मंचावरून उपस्थित महिला भजन संघाच्या महिलेना भाषणातून संबोधत केले प्रथम क्रमांक पारितोषिक मेहरबाबा भजन मंडळ रोहना नांदगाव खडेश्वर,द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक अहिल्याबाई भजन मंडळ जावरा चांदूर रेल्वे तर तृतीय क्रमांक – माऊली भजन मंडळ धामणगाव रेल्वे,चौथे क्रमांक साई भजन मंडळ चांदुर रेल्वे तर पाचवा क्रमांक श्रीराम भजन मंडळ बोरी चांदूर रेल्वे यांना देण्यात आले सोबत पाहुण्यांनी रांगोळी स्पर्धाकानी रेखाटले रांगोळीचे निरिक्षण केले तर नागपूर येथील परीक्षक यांनी भजनाची सुंदर प्रस्तुती केली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपा महिला तालुका अध्यक्ष सविता ठाकरे डॉ सुषमा खंडार,माजी सभापती सरीता देशमुख, अर्पणा जगताप,नंदा माने,माजी नगरसेविका स्वाती मेटे,सुरेखा ताडेकर,दिपाली मिसाळ,मोनिका देशमुख,ऊषा तिनखेडे,मोनाली बाबुळकर,नलिनी मेश्राम व भाजपा युवा कार्यकर्ते नंदा वाधवानी,पप्पू भालेराव,सुरज चौधरी,प्राविण्य देशमुख,अजय हजारे,भाजपा माजी अध्यक्ष संजय पुनसे,रवी उपाध्याय,संदिप सोळंके,विजय मिसाळ,जगदीश कथलकर,धिरेन्द्र खेरडे व इतर भाजपा कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मंचावर प्रभू श्री राम लक्ष्मण जानकीची प्रतिमा
भजन स्पर्धेच्या मंचावर प्रभू श्री राम, लक्ष्मण,जानकी यांच्या प्रतिमासह सुंदर अश्या रांगोळीत माजी आमदार अरूण अडसड व प्रताप अडसड यांचे रांगोळीत रेखाटलेले चित्र शिक्षक निलेश इंगोले यांनी काढली ही रांगोळी उपस्थित सर्वाचे लक्ष वेधत होते.
रांगोळी स्पर्धेत स्पर्धकांनी रेखाटले विकास पर्व
या कार्यक्रमात स्पर्धकानी मतदार संघातील विकास कामे व प्रताप पर्व-विकास पर्वच्या सुंदर चित्र रांगोळीच्या माध्यमातून रेखाटले त्यात निशिगंधा वाड यांच्यी ही चित्र काढण्यात आले महिला स्पर्धकांनी
अयोध्या राम मंदिर व मनुष्य जीवनाशी निगडित संदेश देणार्या सुंदर अश्या रांगोळ्या कार्यक्रमात स्पर्धाकानी रागोळीतून रेखाटल्या होत्या.
चित्रफित दाखवुन विकासाची माहिती
भजन स्पर्धेच्या कार्यक्रमात मतदार संघातील प्रताप अडसड यांच्या विकास कामाची माहिती एक विडिओ चित्रफीत दाखवत नितिन भट्ट यांनी रचित एकच वादा प्रतापदादा या गाण्यावर साची कोहरे हिने कमळच्या फुलाचे निशाण हाती घेत नृत्य सादर केले