प्रतिनिधी
दर्यापूर नगरपालिकेची निवडणूक गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित असल्याने शहरातील विकास कामे रखडली आहेत सर्वसामान्य नागरीकांना दिवसाकाठी समस्या निर्माण झाल्यास नेमकी कुणाची पायरी चढावी ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पहिल्याच पावसात दर्यापूर शहर खड्डेयुक्त चिखलमय झाले आहे पालिका प्रशासनाच्या निवडणुका लांबत चालल्या असून अधिकारी वर्गावर अंकुश दिसत नसल्याचे चित्र आहे तर विकास कामांना अक्षरशः गतिरोधक हा दर्यापूर मध्ये बसलेला दिसत आहे स्वच्छता, नागरिकांच्या समस्या ,गटार व्यवस्था ,घंटागाडी ,कचऱ्याची विल्हेवाट ,बाजार परिसरातील दुर्गंधी, बनोसा, बाभळी, प्रभागातील नाल्याची सफाई ही त्याच अवस्थेत पडून आहे तरी निवडणूक आयोगाने पालिकेचा निवडणुक कार्यक्रम घोषित करून निवडणुका लावण्याची मागणी शहरातील नागरिकांनी व आजी-माजी नगरसेवकांनी केली आहे तर पालिका प्रशासना विषयी नागरिक व्यक्त झाले
➖➖➖➖➖➖➖➖
गेल्या तीन वर्षापासून अनेक समस्या या शहरातील नागरिकांना निर्माण झाल्या आहेत त्या तुलनेत पालिकेला घरट्याक्स व विविध स्वरूपात कर दिला जातो त्या तुलनेत शहरात विकास कामे अद्यापही दिसली नाही तर पालिका कर्मचारी यांच्यावर अंकुश कुणाचाच दिसत नाही
संतोष शिंदे दर्यापूर
➖➖➖➖➖➖➖➖
दर्यापूर नगर परिषदेचा कार्यकाल संपला असून अद्यापही निवडणुका लागल्या नाहीत त्यामुळे नगरसेवक यांचे अधिकार पूर्णपणे गोठल्या गेले आहेत संबंधित कुठलीही अडचण आल्यास नागरिकांचा वाली कोण ? असा प्रश्न आम्हाला पडला आहे तर शहरात सर्वत्र दुर्गंधी पसरलेली दिसत आहे रेल्वे गेट परिसरात अक्षरशः कचऱ्याचा ढीग व चिखल दिसत आहे
उद्योजक अजय ब्रदिया वसु
➖➖➖➖➖➖➖➖
दर्यापूर शहरातील जागृती कॉलनी पंजाबराव कॉलनी सांगळूदकर नगर ही वस्ती अद्यापही विकासापासून कोसो दूर आहे उच्चभ्रू वस्ती म्हणून या नगराची प्रचिती आहे परंतु पावसाळ्याच्या दिवसात पाठ ठेवण्यासाठी सुद्धा जागा शिल्लक नाही संपूर्ण वस्तीमध्ये खड्डे व नाली मधील सांडपाणी रस्त्यावर येत आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य पूर्णपणे धोक्यात आले तर विषारी साप व कीटक हे थेट घरात मार्गक्रमण करीत आहेत
शरद सपकाळ सामाजिक कार्यकर्ते दर्यापूर