436 छात्रसेनिकांचा सहभाग चंद्रपूर ,गडचिरोली, वर्धा जिल्ह्यातील 14 शाळा आणि 14 महाविद्यालयातील विद्यार्थी झाले होते सहभागी.
आर्वी, प्रतिनिधी /पंकज गोडबोले
आर्वी : स्थानिक पीएमश्री नगरपरिषद गांधी विद्यालयातील एकूण 35 छात्रसैनिक हे 21 महाराष्ट्र बटालियन एनसीसी वर्धा यांच्यातर्फे दिनांक 11 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2025 या दहा दिवसीय निवासी एनसीसी बिडी इंजिनिअरिंग कॉलेज सेवाग्राम येथे सहभागी झाले होते. वेगवेगळ्या जिल्ह्यातील 14 शाळा आणि 14 महाविद्यालयामधील विद्यार्थी या शिबिरामध्ये सहभागी झाले होते एकता आणि अनुशासन तसेच देश प्रेम ,देश भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याकरता या शिबिराचे आयोजन करण्यात येत असते यामध्ये दहा दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना सैनिकां प्रमाणे विविध प्रकारचे प्रशिक्षण दिल्या जाते.यामध्ये सकाळी उठून व्यायाम पिटी परेड त्यानंतर नाश्ता त्यानंतर विविध प्रकारचे त्यांचे क्लासेस ज्यामध्ये शस्त्र प्रशिक्षण ,मॅप रीडिंग sdrf प्रशिक्षण ट्राफिक कंट्रोल वेगवेगळ्या विषयांवरील तासिका ड्रिल घेण्यात येते यादरम्यान विद्यार्थ्यांना फायरिंग कशी करावी याचा प्रशिक्षण दिले जाते.



आणि प्रत्येकाला पाच राउंड फायर करण्याच्या सुद्धा संधी दिली जाते यामध्ये पी एम श्री नगरपरिषद गांधी विद्यालयाची कु. आरुषी शाहू हिने एक सेंटीमीटर ग्रुप तयार करून संपूर्ण कॅप मधून प्रथम क्रमांक प्राप्त केला तसेच १०० मीटर रनिंग मध्ये कु. वेदिका गोरले हिने प्रथम क्रमांक प्राप्त करून माननीय कॅम्प कमांडंट लेफ्टनंट कर्नल जीशांतो सी तसेच सुभेदार मेजर दिलबागसिंग यांच्या शुभहस्ते क्लोजिंग ऍड्रेस ला सुवर्ण पदक आणि प्रमाणपत्र मिळवून शाळेचे नाव उंचावले तसेच लोकेश फाळके या विद्यार्थी डेल्टा कंपनीकडून प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता त्यांनी सुद्धा तृतीय क्रमांक प्राप्त केला तसेच शाळेच्या एकूण १३ विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन यावर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन उत्कृष्ट सादरीकरण केले त्यांना सुद्धा प्रोत्सांहनपर पारितोषिक देण्यात आले विद्यार्थ्यांना दहा दिवस आधीचे कठोर प्रशिक्षण या ठिकाणी दिले जाते ते अतिशय यशस्वीरित्या या विद्यार्थ्यांनी पूर्ण केले यासाठी प्राचार्य श्री विश्वेश्वर पायले ,पर्यवेक्षिका कु. ज्योती अजमिरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .दहा दिवसीय एनसीसी शिबिर उत्कृष्ट रित्या पार पाडण्याकरता कॅप्टन प्रवीण ठाकरे ,फर्स्ट ऑफिसर प्रमोद नागरे, थर्ड ऑफिसर विक्रांत भागवतकार ,थर्ड ऑफिसर प्रवीण शेळके, सी टी ओ प्रीती शिंदे, बटालियनचे सर्व भारतीय सेनेतील पर्मनंट इन्स्ट्रक्टर अधिकारी यांचा शिबिरात समावेश होता.
















