रविवार दिनांक 28.9.2025 रोजी जिल्हास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा” स्कूल ऑफ स्कॉलर्स ,अमरावती येथे आयोजित करण्यात आली. नाट्योत्सवाचा मुख्य विषय ” मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान हा होता ” या विज्ञान नाट्योत्सवात अमरावती जिल्यातील 12 तालुक्यातील शाळांनी सहभाग नोंदविला.. विद्यार्थिनींनी उत्तम अभिनय करून नाट्य प्रदर्शित केले ,त्यात “श्रीमती हिराबाई गोयनका कन्या विद्यालय ,धामणगाव रेल्वे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. नाटिकेचा उपविषय ” विज्ञानातील महिला हा होता.
नाटिकेचे लेखन व दिग्दर्शन श्री चंद्रशेखर वडगिरे यांनी केले. हिराबाई गोयनका विद्यालयातील विज्ञान शिक्षक श्री उमेश अरबट व इतर विज्ञान शिक्षकांनी नाटिकेतील चमुला मार्गदर्शन केले.या नाटिकेत वर्ग 8 ते 10 वीत असणाऱ्या विद्यार्थिनीं कु.दिशा विनोद ठोंबरे, , कु अनुष्का टवळे, कु लक्ष्मी डहाणे, कु . जानवी गव्हाणे , कु. नेहा सावंत, कु , तन्वी हांडे, कु. अक्षरा भगत, कु . अनुष्का चौधरी या सर्व सहभागी विद्यार्थिनींनी आपल्या भूमिका छान सादर केल्या . या नाटिकेची निवड अकोला येथे होणाऱ्या विभागस्तरीय विज्ञान नाट्योत्सव साठी झाली. स्कूल ऑफ स्कॉलर्स अमरावती ” येथे पार पडलेल्या जिल्हा विज्ञान नाट्योत्सवामध्ये, सहायक शिक्षण उपनिरीक्षक श्री अतुल वानखडे , जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष श्री. श्रीकांत कडू, सचिव श्री विशाल भोयर , कार्याध्यक्ष विनायक ताथोड हे उपस्थित होते. परीक्षक म्हणून श्री विनोद सुरोशे, श्री नांदगावकर व श्री. काळे लाभले .
संस्थेचे अध्यक्ष अँड श्री. रमेशचंद्रजी चांडक, सचिव अँड श्री .आशिषजी राठी, सहसचिव डॉ श्री .असितजी पसारी, व शाळा समितीच्या अध्यक्षा डॉ सौ. शोभाताई राठी तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनिता देशपांडे, उपमुख्याध्यापक श्री बाळू राठोड ,पर्यवेक्षिका कु.रजनी टेंभुर्णे ,सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी , नाट्य उत्सवामध्ये सहभागी चमूचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.