..दिनांक 25 मार्च 2025 रोजी अमरावती जिल्हा परिषद आणि उद्यम लर्निग फौंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून चालू असलेल्या सक्षम कार्यक्रम अंतर्गत धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित श्रीमती हिराबाई गोयनका कन्या विद्यालय, धामणगाव रेल्वे येथील वर्ग 9 यमुना व 9 सिंधू मधील विद्यार्थिनींनी मुख्याध्यापिका सौ. देशपांडे मॅडम, श्री ईश्वरदास बागडे सर आणि श्री अनुप चरपे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या व्यावसायिक प्रकल्प शाळा स्तरीय प्रदर्शनी मधून निवडून जिल्हास्तरीय प्रदर्शनी मध्ये सहभागी झाल्या होत्या . या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये उद्यमशील मानसिकता आणि जीवन कौशल्ये विकसित करणे आहे.या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्यात उच्च शिक्षण घेण्यासाठी , नोकरी करण्यासाठी आणि व्यवसाय करण्यासाठी आवश्यक जीवन कौशल्ये जसे आत्मविश्वास , स्वजाणीव संवाद कौशल्ये , सहकार्य ,स्वत्रंत विचार , नवीन गोष्टी शिकणे ,सर्जनशील विचारशक्ती आणि चिकित्सक विचार असे शिकविल्या जातात. शाळा स्तरीय प्रदर्शनी मध्ये विद्यार्थ्यांनी ३ P ( व्यक्ती , पर्यावरण आणि नफा ) संकल्पेचा वापर करून वेगवेगळे व्यावसायिक प्रकल्प तयार केले होते. या कार्यक्रमात *जिल्हा परिषद अमरावती च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम सन्माननीय संचिता महापात्रा यांनी प्रकल्प प्रदर्शनीला भेट देऊन विद्यार्थिनींचे कौतुक केले, माध्यमिक शिक्षणाधिकारी, अमरावती माननीय प्रियाताई देशमुख मॅडम यांनी सुद्धा विद्यार्थिनींचे कौतुक व अभिनंदन केले आणि पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. DEIT कार्यालयाचे प्राचार्य कुबडे सर, उपप्राचार्य मानकर सर तसेच जिल्ह्यातील शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी* उपस्थित होते. उद्यम लर्निग फौंडेशन या संस्थेचे कु. अवनी मेवाळा मॅडम(प्रकल्प व्यवस्थापक महाराष्ट्र), श्री.मंगेश काटेखाये सर ,रोशन गोटे सर ,विनोद निंबोळकर सर उपस्थित होते. या प्रदर्शनीमध्ये हस्तकलेतून फोटो फ्रेम या श्रीमती हिराबाई गोयंका कन्या विद्यालयातील प्रकल्पाला विजयी म्हणून घोषित करून रोख रक्कम दोन हजार रुपये प्राप्त झाले. तसेच हा सक्षम कार्यक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुनीता देशपांडे मॅडम यांचा जिल्हा परिषद अमरावतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला त्याचप्रमाणे मार्गदर्शक श्री ईश्वरदास बागडे सर व श्री अनुप चरपे सर यांचा सुद्धा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. ही शाळेसाठी गौरवाची बाब आहे. त्याबद्दल धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी यांनी संपूर्ण टीमचे कौतुक व अभिनंदन केले.
Home आपला विदर्भ अमरावती श्रीमती हिराबाई गोयनका कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय सक्षम कार्यक्रम प्रदर्शनी मध्ये बाजी..