धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित श्रीमती हिराबाई गोयंका कन्या विद्यालया मध्ये दिनांक 19-2-2025 बुधवार रोजी शाळेच्या प्रांगणामध्ये शिवजयंती उत्सवात साजरी करण्यात आली.

0
32
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.देशपांडे मॅडम उपमुख्याध्यापक श्री राठोड सर परिवेक्षिका टेंभुर्णे मॅडम यांनी विद्येचे आराध्य दैवत माता सरस्वती व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. वर्ग सहा कोयना मधील कार्तिकी गायकवाड, ईश्वरी गायकवाड, श्रावणी तितरे, श्रुतिका ठाकरे, मृणाल ढाकुलकर ,समृद्धी तितरे, आरोही वासनिक, प्रणिता बाभुळकर, समृद्धी ठाकरे स्वराली बोबडे या विद्यार्थिनींनी “माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर”,वर्ग सात गोमती मधील स्वराली देशमुख, राधिका हुडे, काव्या लोखंडे,स्वरा काळे, मान्यता गाडेकर, जानवी तितरे या विद्यार्थिनींनी “बघा.. बघा.. शिवरायांनी युगत मांडली” तर वर्ग 9 गंगा मधील एकता लोंदे, कनक मुंदडा श्रावणी गांडोळे, जानवी गव्हाणे या विद्यार्थिनींनी “राजा होता तो एकच महान”तर वर्ग नऊ यमुना मधील चैताली गावंडे,सावली गणवीर,प्रचिती गायकवाड, प्राची साकुरे या विद्यार्थिनींनी “महाराजाची कीर्ती बेफाम”अश्या महाराजांची शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे स्फूर्तीदायक पोवाडे सादर केले. वर्ग आठ वर्गामधील दीपिका चौधरी हिने “दैवत छत्रपती”हे गीत सादर केले. वर्ग 8 मधील विद्यार्थिनींनी शिवनेरी रायगड विजयदुर्ग सिंधुदुर्ग तोरणा जिंजी प्रतापगड विशालगड पन्हाळा तोरणा इत्यादी शिवाजी महाराजांच्या संबंधित असलेल्या किल्ल्यांच्या माहितीचे लेखन व संकलन सादर केले. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ देशपांडे मॅडम यांनी अध्यक्षीय भाषणात “निश्चयाचा महामेरू| बहुत जणांशी आधारू || शिवरायांचे आठवावे रूप | शिवरायांचा आठवावा प्रताप|| शिवरायांचे कैसे बोलणे| शिवरायांचे कैसे चालणे|| यशवंत,किर्तीवंत ,नीतिमंत, जाणता राजा, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची महती/ महात्म्य विद्यार्थिनींना सांगितले.या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते

veer nayak

Google Ad