“नैसर्गिक रंगाचा वापर करूया,
पर्यावरण पूरक होळी साजरी करूया.”
श्रीमती हिराबाई गोयनका कन्या विद्यालयामध्ये आज दिनांक 13 मार्च 2025 रोजी पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली. या विशेष उत्सवात रंगाची होळी साजरी करण्याकरिता कृत्रिम रंगाचा वापर न करता नैसर्गिक रंगाचा वापर करण्यावर भर देण्यात आला. वर्ग ८ मधील विद्यार्थिनींनी विविध फुलांचा अर्क ,हळद ,बिट्स व मक्याच्या पिठापासून रंग निर्मिती आणि इतर नैसर्गिक घटक वापरून पर्यावरणाचे रक्षण करत होळी साजरी करण्यात आली.
आपण होळी का साजरी करतो?हे पौराणिक कथेतून होलिका दहनाचे महत्त्व कु.जानवी ठाकरे यांनी सांगितले तर मथुरेच्या होळीचे (ब्रज ची होळी)महत्त्व विधी चौधरी ने तर रासायनिकाचे रंगाचे परिणाम व नैसर्गिक रंगाचे महत्त्व त्रिशा गवई या विद्यार्थिनींनी सांगितले.
तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या “दुर्गुणांची करूया होळी “या संकल्पनेतून वर्ग ९ शरयूच्या प्रत्येक विद्यार्थ्यांनीनी आपल्या वाईट गुणांचे दहन करून होळी सणाचे महत्त्व जाणले.
यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ. देशपांडे मॅडम तसेच प्रमुख पाहुणे सन्माननीय रोशनजी ठवकर सर वनरक्षक, सामाजिक वनीकरण विभाग धामणगाव रेल्वे,सहायक श्री.अरविंद गोमासे,तसेच हरित सेनेचे प्रमुख शाळेचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय वडगिरे सर यांनी भूषविले. त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ देशपांडे मॅडम यांनी “करूया दुर्गुणांची होळी “हा संदेश देऊन विद्यार्थिनींना पर्यावरणाला पूरक अशा रंगांपासून रंग निर्मिती करून आपण होळी साजरी केली पाहिजे असे विद्यार्थ्यांनी सांगितले, तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रोशन जी ठवकर सर यांनी यांनी हळदी पासून पिवळा ,रंग पालेभाज्या उकळून त्यापासून हिरवा रंग, असे वेगवेगळे रंग वापरून आपण निसर्गाला पूरक अशा रंगाची निर्मिती करू शकतो असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक वडगिरे सर यांनी केले, तर कार्यक्रमाचे संचालन वर्ग 9 शरयु मधील विद्यार्थिनी कु. अनुष्का भगत व श्रावणी ठाकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सृष्टी उडाके हिने केले. या कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर बंधू उपस्थित होते.