मृत्यूसही न डरले मनी धर्मवीर
फुटले स्वनेत्र, तुटले जरी जीभशीर
दुरदांत दाहक ज्वलंत समाज व्हावा
म्हणूनी उरात धरूया शिवसिंह छावा..
या श्लोकाचा अर्थ असा मृत्यू समोर असतांना सुद्धा शंभूराजे जराही घाबरले नाही.औरंग्याच्या आदेशानुसार संभाजी महाराज व कवी कलश यांचे डोळे फोडले आणि त्यांची जीभ ही कापण्यात आली हे सर्व अत्याचार त्यांनी फक्त आणि फक्त देव,देश आणि धर्मासाठी सहन केले म्हणून आपल्या समाजात देव,देश धर्मासाठी असलेले समर्पण, त्याग रक्तातील ती धग आणायची असेल तसेच प्रत्येकाच्या डाव्या उजव्या काळजात लहान मोठ्या मेंदूत रक्ताच्या पेशी पेशीत श्री शिवशंभू छत्रपती साठवायचे असतील तर “धर्मवीर बलिदान मास” पाळणे हे प्रत्येक हिंदूचे परम कर्तव्य आहे..
धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित से.फ.ला.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,धामणगाव रेल्वे जिल्हा-अमरावतीचे कला शिक्षक- चित्रकार अजय जिरापुरे यांनी आपल्या फलक रेखाटनाच्या माध्यमातून रनमर्द, रणझुंजार, धर्मवीर श्रीमंत छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या (फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या.. दिनांक – 10 मार्च ते 8 एप्रिल 2024 ) बलिदान मासनिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस मानाचा मुजरा केला आहे..