8 -10 दिवसांत चांदूर रेल्वे स्टेशनवर शालीमार एक्सप्रेसचा थांबा मिळणार…! खासदार रामदास तडस यांचे आश्वासन चांदूर रेल्वेत जबलपुर एक्सप्रेसचा थांबा मिळाल्याने जंगी स्वागत रेल रोको कृती समिती व खासदारांचे यशस्वी प्रयत्न

0
25
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

(ता. प्र.) चांदूर रेल्वे

स्थानिक रेल रोको कृती समितीकडून शालीमार एक्सप्रेस व जबलपुर एक्सप्रेसच्या थांब्याची मागणी करण्यात आली होती. तसेच मागणीसाठी १७ फेब्रुवारीला आंदोलनाचा इशारा दिला होता. या मागणीचा मी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा केला व आंदोलनापुर्वीच रेल्वे बोर्डाकडून चांदूर रेल्वे स्टेशनवर जबलपुर एक्सप्रेसचा थांबा मंजुर करण्यात आला. तर येत्या ८ – १० दिवसांत शालीमार एक्सप्रेसच्या थांब्याची दुसरीही मागणी पुर्ण करणार असल्याची ग्वाही खासदार रामदास तडस यांनी दिली. ते स्थानिक स्टेशनवर आयोजित सत्काराच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.

चांदूर रेल्वे स्थानकावर कोरोनापूर्वी थांबणाऱ्या रेल्वे गाड्यांपैकी जबलपूर एक्स्प्रेस (१२१५९/१२१६०) आणि शालिमार एक्स्प्रेस (१८०२९/१८०३०) या दोन गाड्यांचा थांबा कोरोनानंतर रद्द करण्यात आला. त्यामुळे चांदूर रेल्वे सह आजुबाजुच्या तालुक्यातील लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे १७ फेब्रुवारी रोजी चांदूर शहर बंद ठेवून त्यानंतर त्याच दिवशी सर्व नागरिक रेल्वे रुळावर येऊन रेल रोको महाआंदोलन करू असा इशारा रेल रोको कृती समितीने रेल्वे विभागाला दिला होता. यानंतर खासदार रामदास तडस यांनी रेल्वे विभागाकडे दिल्ली येथे जाऊन पाठपुरावा केला व स्थानिक परिस्थिती तेथील अधिकाऱ्यांना अवगत करून दिली. यानंतर १६ फेब्रुवारीलाच सायंकाळी जबलपुर एक्सप्रेसच्या थांब्याचे पत्र रेल रोको कृती समितीला मिळाले व शालीमार एक्सप्रेसच्या थांब्यासाठी प्रयत्न करण्याचे लेखी आश्वासन नागपुर येथील रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले होते.

यानंतर २२ फेब्रुवारीपासून अमरावती – जबलपुर एक्सप्रेसचा थांबा सुरू झाल्यामुळे याचा आनंद साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी रेल्वे स्टेशनवर गर्दी केली होती. जबलपुर – अमरावती एक्सप्रेसने खासदार रामदास तडस हे स्वत: चांदूर रेल्वे स्टेशनवर आले. स्टेशनवर ट्रेनचे आगमन होताच लोकोपायलट व गार्ड यांचा हार घालून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच खासदार रामदास तडस, आमदार प्रताप अडसड, रेल रोको कृती समितीचे अध्यक्ष नितीन गवळी व इतरांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर रेल्वे रवाना झाली. यानंतर स्टेशन परिसरात छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रताप अडसड, रेल रोको कृती समितीचे अध्यक्ष नितीन गवळी, भाजपा धामणगाव विधानसभा प्रमुख रावसाहेब रोठे, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अनिता तिखिले, डॉ. सुषमा खंडार, बंडूभाऊ भुते, बबनराव गावंडे, राजाभाऊ भैसे, मेहमुद हुसैन, मदन कोठारी आदींचा मंचावर उपस्थिती होती. यावेळी खासदार रामदास तडस, आ. प्रताप अडसड, नितीन गवळी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन भारत गेडाम यांनी तर आभार प्रदर्शन अजय हजारे यांनी केले. यावेळी भाजपा निमंत्रक प्रवण जोशी, खा. पीए राजु हजारे, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य डॉ. वसंतराव खंडार, बच्चू वानरे, बाळासाहेब सोरगिवकर, विजय मिसाळ, गुड्डू बजाज, अजय हजारे, विलास तांडेकर, शेख सोनु, बळवंत नागणे, छोटू देशमुख, केशव वंजारी, विलास ठाकरे, गजु ठाकरे, राजु चौधरी, संदिप सोळंके, रेल रोको कृती समितीचे सदस्य भारत गेडाम, डॉ. क्रांतीसागर ढोले, संजय डगवार, प्रा. रवींद्र मेंढे, बंडूभाऊ यादव, अविनाश कैलकार, निलेश होले, रामदास कारमोरे, हर्षल वाघ, पराग बेराड, देवानंद खुणे, प्रशांत शिरभाते, नानासाहेब डोंगरे, प्रदीप मेश्राम, लवकुश खुणे, स्वानंद चौधरी, विनोद लहाणे, सचिन चुटके, डॉ. प्रशांत कोठेकर, प्रफुल्ल गुल्हाणे, दत्ता जोशी, दिपक भारूका, ओमप्रकाश मानकर, भीमराव खलाटे, महादेव शेंद्रेे, विनोद जोशी, संजय चौधरी, शशिकांत गाडेकर, शेख हसनभाई, नंदु सोरगिवकर, सतिष चौधरी व अनेक नागरिक उपस्थित होते. यासर्व कार्यक्रमादरम्यान नागपुर येथील आरपीएफचे सहाय्यक सुरक्षा आयुक्त श्रीकुमार कुरूप यांच्या नेतृत्वात वर्धा रेल्वे पोलीस निरिक्षक रामसिंग मिना, उपनिरिक्षक एच. एल. मिना, एएसआय गजानन जाधव, खुपिया शाखेचे धिरज पठारे, बडनेरा रेल्वे पोलीस खुपिया सुनिता चौधरी, स्थानिक पो.स्टे. ठाणेदार अजय अहिरवार व इतर कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त होता.

1) रेल्वे प्रशासनाकडून उपस्थितांचा सत्कार

स्थानिक रेल्वे स्टेशनवर खासदार रामदास तडस, आमदार प्रताप अडसड, रेल रोको कृती समितीचे अध्यक्ष नितीन गवळी, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य बच्चू वानरे, भाजपाचे प्रणव जोशी यांचा रेल्वे प्रशासनाच्या वतीने एडीआरम रूपेश चांदेकर (नागपुर) यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रेल्वेचे नागपुर येथील एसीएम (टीसी) संजय मुळे, सीसीआय त्र्यंबक पुष्पलवार, टीआय नितेशकुमार सिंग, स्टेशन प्रबंधक दिपीका बाजपेयी, उपस्टेशन प्रबंधक देवेश बाजपेयी व इतरांची उपस्थिती होती.

2) शालीमार एक्सप्रेसचा थांबा मिळाल्यावरच आनंद – नितीन गवळी

आमच्या तालुकावीसायांची जबलपुर एक्सप्रेस आणि शालीमार एक्सप्रेस या दोन रेल्वे गाड्यांच्या थांब्याची मागणी होती. मात्र जबलपुर एक्सप्रेसचा थांबा मिळाला असुन शालीमार एक्सप्रेसच्या थांब्याचे आश्वासन मिळाले आहे. खा. रामदास तडस हे पाठपुरावा करीत असुन लवकरच ते शालीमार एक्सप्रेसचा थांबा आम्हाला मिळवून देतील अशी अपेक्षा आहे. यानंतरच आम्ही खरा आनंद धुमधडाक्यात साजरा करू अशी प्रतिक्रीया रेल रोको कृती समिताचे अध्यक्ष नितीन गवळी यांनी दिली.

veer nayak

Google Ad