स्थानिक जुना धामणगाव .. येथे संस्कार दिनाचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा सहवास लाभलेले आचार्य वेरूळकर गुरुजी यांनी संस्कार ही वर्तमान काळातील व भूतकाळातील गरज आहे .मनुष्य हा पशुवत समजला जातो हे ओळखून गुरुजींनी समाजातील तरुण व बालक संस्कारक्षम व्हावा यासाठी संस्कार शिबिराची सुरुवात केली व हजारो युवक संस्कारक्षम केले म्हणून त्यांचा जन्मदिवस संस्कार दिन म्हणून साजरा करतात या उद्देशाने डॉक्टर मुकुंदराव के .पवार शैक्षणिक संकुल ,जुना धामणगाव वीर शिवबा वस्तीगृह यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गुरुदेव सुसंस्कार वर्ग यांच्या तर्फे संस्कार दिनाचे आयोजन करण्यात आले होते या संस्कार दिनाच्या आयोजनासाठी संस्थेचे सचिव शिवाजीराव पवार समन्वयक प्राध्यापिका जया केने प्राचार्य मोहम्मद उज्जैन वाला उपप्राचार्य दीप्ती हांडे सीबीएससी प्राचार्य सुशांत देवनाथ यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाला संमती देऊन शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे ,महेश धांदे ,शुभम मोरे, हर्ष वाखेकर,हर्षल गावंडे, हर्षल पाटील , सागर नन्नावरे,काजल मून व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली .गुरुदेव हमारा प्यारा है जीवन का उजियारा या संकल्प गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली . संस्कार दिन व आपले गुरु म्हणजे आई वडील यांच्या विषयी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी भाषणामध्ये सृष्टी सोळंके अक्षिता पवार, प्रज्ञा तोटे, स्नेहा गायकवाड , आरोही देवकर, रिधिना ठाकूर ,वीर धवणे, सागर बोधुलवार वंश लोहकरे, विश्वजीत चवरे यांनी आई विषयी विचार व्यक्त केले. आई माझा मायेचा सागर हे गीत सागर पाखरे , तुषार ठाकरे, विश्वजीत सोळंके यांनी सुंदर आवाजात सादर केले. त्यासोबतच आई विषयी अक्षता पवार, रचना सोळंके, आरोही भोसले, संध्या करवते, दिव्या पवार ,अनुश्री पवार यांनी हंबरून हम वासराले चाटती जवा गाय तवा तिच्या मधी दिसती माझी माय हे गीत सादर केले संस्कार वर्गाच्या विद्यार्थ्यांना यावेळी विविध संतांचे ग्रंथ ग्रामगीता, भगवद्गीता, दासबोध ,संस्कार प्रदीप ,पुस्तके उपस्थित शिक्षकांच्या हस्ते ग्रंथ भेट देण्यात आले.
आई वडील हेच आपले गुरु आहे शिक्षक हे आपले गुरु आहे म्हणून यावेळी मातृ-पितृ पूजन करून आरती ओवाळण्यात आली .सर्व शिक्षकांना कुंकुम तिलक करून त्यांना पुष्पगुच्छ देऊन संस्कार वर्गातील विद्यार्थ्यांनी नमस्कार करून आशीर्वाद घेतले. या कार्यक्रमाला काजल मून, वैशाली धडके माधुरी शेलोकार प्रणिता शेंडे, पाटील ,गोकुळ काळे, संजय मसराम, यांनी विशेष सहकार्य केले. विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रवंदना म्हणून करण्यात आला.