मोर्शी तालुक्यातील विमान भूपृष्ठावरील जलस्त्रोतांचे पर्यवेक्षण करणारे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : जिल्हा प्रशासनाचे आवाहन

0
0
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अमरावती, दि. 19 : मोर्शी तालुक्यातील काही भागात आज एक विमान भूपृष्ठाजवळ घिरट्या घालताना दिसून आले आहे. हे विमान विमान भूपृष्ठावरील जलस्त्रोतांचे पर्यवेक्षण करणारे असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

आज सकाळी साडेसात ते आठ वाजता मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर मंडळात खेड, तळेगाव, धामणगाव आणि आष्टगाव या परिसरात आकाशातून एक विमान भूपृष्ठाजवळ घिरट्या घालताना नागरिकांना स्पष्टपणे दिसले. हे विमान जवळपास अर्धा तास या भागात घिरट्या घालत होते. या संदर्भात जिल्हा प्रशासनाने सदर विमान भूपृष्ठावरील जलस्त्रोतांचे पर्यवेक्षण करण्यासाठी यंत्रणेकडून वापरण्यात आले आहे. या विमानाद्वारे भागातील पाण्याच्या साठ्याची माहिती घेतली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नागरिकांनी आवश्यकता भासल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे दूरध्वनी क्रमांक 0721-2662025 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

veer nayak

Google Ad