गणेश चतुर्थीच्या तिसऱ्या दिवशी गौरी म्हणजे माहेरवाशीण घरी येते. यंदा मंगळवारी घराघरात आई गौराईचे स्वागत मोठ्या थाटामाटात करण्यात आले, तर बुधवारी धामणगाव रेल्वे मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रताप अडसड यांनी ज्येष्ठागौरीचे पूजन करण्यात आले. आई गौराईला भरजरी साडी नेसवून तिचा ठुशी, नथ, हातात हिरव्या बांगड्या आदी पारंपरिक दागिन्यांनी साजशृंगार करण्यात आला.
लेक घरी आल्याचा आंनद आणि उत्साह कायम ठेवत आपल्या लाडक्या आई गौराईची मनोभावे पूजा केली, तसेच सुहासिनी महिलांनी आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे, यासाठी सर्वात महत्त्वाचा मान म्हणून गौरीपूजेसाठी सुपात ओवसा भरण्याची पद्धत आहे. यासाठी सुहासिनी महिला दरवर्षी नवीन सुप खरेदी करतात.
त्यात विड्याची पाने, सुपारी, फुले, ओवसासाठी लागणारे बदाम, खारीक, खोबरे व वडे, खीर, असा ओवसा भरून आई गौराईला नैवेद्य दाखवून मनोभावे तिची पूजा केली. पूजेच्या दिवशी रात्रभर सुवासिनी महिला गाणे गातात, नृत्य करतात. फुगड्या, गोंधळ घालून गौरी जागवतात.