प्रतिनिधी-
दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदार संघाचे गाजत असलेले विकास पुरुष म्हणुन आमदार बळवंत वानखडे यांचे नाव आजच्या स्थितीत मनात पेरले गेलेले आहे , गल्लीबोळीपासून तर मुंबई च्या सत्तैच्या राजमार्गा पर्यंत स्वकर्तृत्वावर ओळख सुद्धा बळवंत वानखडे यांनी निर्माण केली आहे अनेक आपल्या राजकीय वाटचालीला छोट्या-मोठ्या निवडणुकीत अधिक मताधिक्याने विजय संपादन केला जातीपातीला थारा न देता केवळ समाज कार्याचं दायित्व ते आहे पर्यंत खांद्यावर पेलवत आले आहे कुठलाही प्रसिद्धीचा हव्यास नसून शांत व एकाग्रचित्ताने पक्षासाठी व समाजासाठी प्रसंगी निर्णय घेतले अनेकदा त्यांचा पराभव करण्यासाठी छोटे मोठे पक्ष सुद्धा एकत्रित आले होते या सर्व बाबींना फाटा देत विजयी घोडदौड बळवंत वानखडे यांची सतत कायम राहिली
लेहगाव ह्या छोट्या शा ग्रामपंचायत चे सदस्य ते आमदार असा त्यांचा झंझावाती राजकीय प्रवास असून ते एकमेव असे भविष्यातील अमरावती लोकसभेचे प्रतिनिधी असतील लेहगाव ग्रामपंचायत मधून एक वेळा सदस्य तर एक वेळ सरपंच पदाची धुरा सांभाळली नंतर जिल्हा परिषदेवर दोन वेळा सदस्य म्हणून निवडून गेले व आरोग्य वित्त विभागाचे सभापतीपद हे सुद्धा त्यांनी यशस्वी भुषवले अमरावती जिल्हा परिषद सभापतीचा राजीनामा देत थेट दर्यापूर अंजनगाव आमदारकीची निवडणूक लढवत त्या निवडणुकीत विक्रमी अशा 33000 हजार इतक्या मताधिक्क्याने भाजप उमेदवाराचा दणदणीत पराजय करीत निवडून आले हीच त्यांची राजकीय ताकद सार्या महाराष्ट्राने जवळून बघितली यासह कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा तब्बल तीन वेळा संचालक म्हणून निवडून गेले सहकारी सोसायटी थीलोरी व लेहगाव येथून सुद्धा निवडून आले अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेत निवडणुकीची चुरस निर्माण झाली होती त्यामध्ये सुद्धा पहिल्यांदाच उमेदवारी अर्ज दाखल करत आपले निर्विवाद वर्चस्व स्थापन केले
स्वताला कुठलाही राजकीय वारसा नसताना सुद्धा राजकीय कारकीर्द गाजवली जनमानसात सलोख्याचे संबंध सुखदुःखात असलेल्या कुटुंबियांच सांत्वन आमदार बळवंत वानखडे यांनी केले यावर सुद्धा विरोधकांनी अनेक हास्यास्पद विनोद केले होते फोल स्वरूपाचे आश्वासन न देता आपल्या कार्यक्षेत्रातील विकास कामे गतिमान केली असा हा खडतर प्रवास बळवंत वानखडे यांचा आहे सद्या होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत आमदार बळवंत वानखडे हेच काँग्रेस पक्षाचे उमेदवार असणार यात शंका नाही असे काँग्रेस प्रेमी पदाधिकारी व इतर सामाजिक संस्थांनी आपले मनोगत बोलताना व्यक्त केले आमदार बळवंत वानखडे हेच लोकसभेचे बलाढ्य उमेदवार असून बळवंत वानखडे यांना अनेक राजकीय अनुभव आहेत त्यामुळे इतर प्रतिनिधींच्या तुलनेत ते सरस ते ठरणार आहेत ,ह्यात शंका नाही लोकसभेच्या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व बळवंत वानखडे हे स्थापन करणार असल्याने विरोधकांनी उलट सुलट चर्चा प्रसारमाध्यमांवर व्हायरल केल्या आहेत परंतु याचा कुठलाही फरक जाणवणार नसल्याचे चित्र निर्माण आहे अमरावती जिल्ह्यात काँग्रेसच्या वतीने बळवंत वानखडे यांच्या नावाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात जोर धरत आहे यासह महाविकास आघाडी तर्फे सुद्धा बळवंत वानखडे यांच्याचं नावाला सर्वाधिक पसंती क्रम मिळाला आहे एकंदरीत बघता ग्रामपंचायत सदस्य ते लोकसभेचा खडतर प्रवास सोसलेले एकमेव प्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख झाली आहे….. आपल्या दर्यापुर मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी दिल्ली गाजविणार हे सांगायला कुठल्याही भविष्य व्यक्तीची आवश्यकता नाही हे निर्विवाद सत्य जन माणसाच्या मनातून व्यक्त होत आहे