विविध मागण्या करिता अपंगांचे तहसीलदारां कडे मागणी

0
27
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अपंगांना सुविधा मिळण्यास उशीर / अपंगाचे आरोप

चांदुर रेल्वे / तालुक्यातील अपंग निराधार करिता शासनाने अनेक योजना सुरू केले आहे, पण प्रशासनाच्या दिरंगाई धोरणामुळे या योजनेचा लाभ तालुक्यातील निराधार अपंगांना मिळत नसून ते आजही अनेक योजने च्या लाभापासून वंचित आहे, तरी प्रशासनाने आपल्या दिरंगाई धोरणात बदल करून अपंगाच्या हक्काच्या योजने चा लाभ अपंगांना देण्यात यावे, याबाबतचे निवेदन अपंग जनता दल च्या वतीने गुरुवार 31 जुलै रोजी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात मागणी केली आहे,

 अपंगांनी दिलेल्या निवेदनात खालील प्रमाणे मागण्या केली

1 ) अपंग निराधाराना तत्काळ अंतोदय योजनेमध्ये समाविष्ट करून राशन कार्ड त्वरित वितरित करण्यात यावे 

2) दरमहा निराधार योजनेचे मानधन बँक खात्यात जमा करण्यात यावे 

3) अपंग निराधार यांना रोजगार हमी योजनेमध्ये गावातच कामे देण्यात यावी 

4) निराधार योजनेचे प्रलंबित प्रस्ताव त्वरित निकाली काढण्यात यावे 

5) आपल्या कार्यालय अंतर्गत अपंग अनुशेष मधून नियुक्ती मिळालेल्या बोगस अपंग कर्मचाऱ्यांच्या अपंगत्वाची फेर पडताळणी करण्यात यावी 

6) अपंगांना घरकुल योजनेचा त्वरित लाभ देण्यात यावा, वरील मागण्याची दखल न घेतल्यास येणाऱ्या काळात अपंगांच्या वतीने प्रशासनाच्या विरोधात त्रिव स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व याची सर्वस्व जबाबदारी ही प्रशासनाची राहील असे सुद्धा यावेळी दिलेल्या निवेदनात सांगण्यात आले

यावेळी अध्यक्ष शेख अमित, निशिकांत रामराव सोनवणे उपाध्यक्ष,निलेश रवींद्र खेडकर, अमरसिंग शिंदे सुनील लोखंडे अशोक ठाकरे शेख मेहताब, अतुल तिखे, आधी संघटनेचे सदस्य यावेळी हजर होते,

veer nayak

Google Ad