प्रतिनिधी. मुबीन शेख
शिरजगाव कसबा.
शिरजगाव कसबा.अमरावती ग्रामीण जिल्ह्यात येणारे चांदूरबाजार तालुक्यातील ग्राम शिरजगाव कसबा येथील अल्पसंख्यांक समुदाय येणारे स्वर्गीय शिक्षक अनिस अहेमद खान कुरेशी यांचा मुलगा डॉ.हादी अल्तमश खान कुरेशी यांनी विदेशात एम.बी.बी.एस परीक्षा उत्तीर्ण करून आपल्या समाजाचा तसेच आपले गावाचा नाव रोशन केला आहे.
वडीलाचे निधनानंतर अनेक कष्ट करून एम.बी.बी.एस पदवी प्राप्त केली आहे त्यांना पदवी प्राप्त होताच सर्व नातेवाईक तसेच गावकरी मंडळी त्यांचे कौतुक करत आहे. तसेच दिनांक ०२ फेब्रुवारी रोजी मिर्जा नाज़िम बेग मित्र परिवारा कडून डॉ. हादी अल्तमश खान यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री महेंद्र कुमार गवई पोलीस कॉन्स्टेबल मोहित चौधरी,तसेच मिर्जा नाज़िम बेग, हाजी साहेब खान ठेकेदार, हाजी अब्दुल जमील, अब्दुल रशीद, रहेमत खा पठाण, अब्दुल राज़िक उर्फ राजू कश्मीरी, अब्दुल शहजाद, अफजल खान,मुजीब सर,मुबीन शेख पत्रकार,अब्दुल जावेद व सर्व मित्र परिवार चे मान्यवर उपस्थित होते.