अमरावती, दि. 29 (: गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री पंकज भोयर शनिवार, दि. 1 फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
दौऱ्यानुसार, श्री. भोयर यांचे शनिवारी दुपारी 12 वाजता अमरावती येथे आगमन होईल. त्यानंतर डॉ. पंजाबराव देशमुख विज्ञाननगरी, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय येथील 52वी राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 1 वाजता जोग स्टेडीयमजवळ वसंत हॉल येथे पोलीस परिवारासोबत संवाद साधतील. दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे म्हाडाच्या प्रादेशिक विभाग बैठकीस उपस्थित राहून सोयीने नागपूरकडे प्रयाण करतील.