धामणगाव रेल्वे,
येथील श्रीराम शिक्षण संस्थेद्वारा संचालित स्वर्गीय नंदलाल लोया कन्या विद्यालय व श्रीराम कनिष्ठ महिला महाविद्यालय च्या वतीने रक्षाबंधन उत्सवाच्या निमित्ताने सीमेवर संरक्षण करणाऱ्या सैनिकांकरिता १००१ राख्या पाठवण्यात आल्यात
स्वर्गीय नंदलाल लोया कन्या विद्यालय व श्रीराम कनिष्ठ महिला महाविद्यालय येथील वर्ग ५ ते १२ पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी स्व: हस्ते राख्या तयार करून सैनिकांना पाठवण्याचा मानस व्यक्त केला होता
या अनुषंगाने पुलगाव येथील मिल्ट्री कॅम्पच्या माध्यमाने स्वर्गीय नंदलाल कन्या विद्यालय व श्रीराम कनिष्ठ महिला महाविद्यालय येथील प्राचार्य अर्चना सतीश राऊत यांनी मिल्ट्री कॅम्प ला भेट देऊन तेथील मिल्ट्री कॅम्पचे ब्रिगेडियर यांना सर्व विद्यार्थिनींनी तयार केलेल्या राख्या हस्तांतरित केल्यात सदर राख्या पुलगाव मिलिटरी कॅम्प च्या माध्यमाने सिमेवर देशाचे अहोरात्र रक्षण करणाऱ्या सैनिकांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत
………………………….
मिल्ट्री कॅम्प मध्ये सुद्धा रक्षाबंधन उत्सव …..
उपरोक्त प्रसंगी पुलगाव येथील मिलिटरी कॅम्पमध्ये विद्यार्थिनींनी तयार केलेल्या राख्या पोहोचण्याकरीता गेलेल्या प्राचार्य अर्चना सतीश राऊत यांनी पुलगावच्या मिल्ट्री कॅम्पच्या ब्रिगेडियर सह अन्य सहकार्यांना सुद्धा राख्या बांधल्यात आणि ओवाळणी करून रक्षाबंधन उत्सव साजरा केला