महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी घेतला वैद्यकीय अधिकारी यांचा आढावा

0
35
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अमरावती – अमरावती महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी सर्व शहरी आरोग्य केंद्र, आरोग्य वर्धणी केंद्र चे स्त्री वैद्यकीय अधिकारी तसेच वैद्यकीय अधिकारी यांचा मासिक आढावा घेण्यात आला ह्या मध्ये माता व बाल संगोपन, असंसर्ग आजार ची माहिती, लसीकरण ची माहिती ,क्वालिटी अशुरान्स ,डेंग्यू ,मलेरिया व मान्सून पूर्व प्रतिबंधात्मक उपाय, बोगस डॉक्टर ,व शहरी आरोग्य केंद्रातील वेळोवेळी येणारे अडचणी वर कोणत्या उपाययोजना करावे ह्या बाबत संपूर्ण तीन तासाचा आढावा बैठक घेण्यात आआला ह्या बैठकीला डॉ विशाल काळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती दिली व डॉ.संदीप पाटबागे डॉक्टर इन्चार्ज मुख्यालय यांनी एनसीडी पोर्टल बाबत मासिक अहवाल दिला. 

 

तसेच डॉ स्वाती कोवे आर सी एच वैद्यकीय अधिकारी यांनी माता व बाल संगोपना ची व लसीकरण ची माहिती दिली आणि डॉ रुपेश खडसे साथ रोग अधिकारी यांनी डेंग्यू ,मलेरिया जलजन्य ,कीटकजन्य आजाराची तसेच मान्सून पूर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना कश्या प्रकारे करावे ह्या बाबाचा अहवाल सादर केला, डॉ फिरोज खान शहर क्षय रोग अधिकारी यांनी टी बी बाबतची माहिती दिली ,कुटंब कल्याण प्रशिक्षण केंद्रातील डॉक्टर यांनी आपातकालीन स्थितीत रुग्ण यांना सी पी आर कसा देण्यात यावा याचे प्रत्याशिक देण्यात आले ह्या आढावा बैठकीत डॉ अश्विनी खडसे, डॉ पौर्णिमा उघडे, डॉ वैशाली काकडे, डॉ मनोज मुंधढा , डॉ अल्मास खान, शहर क्षय रोग अधिकारी डॉ फिरोझ खान , डॉ वैशाली मोटघरे, डॉ मानसी मूरके, डॉ आकिब खान डॉ तरोडेकर व इतर सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते

veer nayak

Google Ad