चौथ्या श्रेणीचा दर्जा न दिल्यास १२ सप्टेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन
धामणगाव रेल्वे (जि. अमरावती)
महाराष्ट्रातील महसूल सेवक (कोतवाल) पदास चौथ्या श्रेणीचा दर्जा व शासकीय सेवकांप्रमाणे सर्व सुविधा देण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. शासनाने वारंवार आश्वासने देऊनही अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नसल्यामुळे महसूल सेवक संतप्त झाले आहेत.
विदर्भ महसूल सेवक संघटना तालुका शाखा, धामणगाव रेल्वे यांच्या वतीने १२ सप्टेंबर २०२५ पासून तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

संघटनेची ठाम मागणी ↓
- महसूल सेवकांना चौथ्या श्रेणीचा दर्जा द्यावा.
- शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनमान, सेवा सुविधा व निवृत्तीवेतन लागू करावे.
- शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास राज्यभर आंदोलन उग्र करण्याचा इशारा.
—
पदाधिकारी व सदस्य
✦ अवधूत पिपोले – अध्यक्ष
✦ विपुल राळेकर – उपाध्यक्ष
✦ राहुल तायडे – सचिव
सदस्य : प्रदीप देशमुख • अजय नेरकर • सलीम खुरेशी • अमोल खंडारे • मनोज लांबडे • प्रगती वानखडे • शुभांगी इंगोले • पद्मा ताडाम • रुपाली शेळके • रवींद्र घाटे • अतुल जगताप • सोनी इंगळे • स्वाती मनोहरे • दिलीप वाळके • सुमित तुमसरे • मंगेश काळे • एकनाथ गंथळे
संघटनेचे आवाहन : “महसूल सेवकांना न्याय मिळेपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील…!”












