मातोश्री फाउंडेशन ने संक्रांति हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात दिला पर्यावरण व सामाजिकतेचा संदेश

0
9
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

मंगरूळ दस्तगीर:-सामाजिक कार्यात मंगरूळ दस्तगीर परिसरात अग्रेसर असणाऱ्या मातोश्री फाउंडेशन या संस्थेने महिलांसाठी संक्रांतीनिमित्त हळदी कुंकवाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला गावातील शेकडो महिलांनी उपस्थिती दर्शविली..

एकीकडे समृद्ध परंपरेचे जतन करत असतानाच दुसरीकडे सध्या स्थितीमध्ये जे सुरू आहे अशा स्थितीवर दुर्लक्ष करता येणार नाही म्हणून मकर संक्रांति निमित्त हळदी कुंकू आज चा कार्यक्रम साजरा करताना मातोश्री फाउंडेशनने सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत पर्यावरण रक्षना चा सुद्धा संदेश दिला आहे.
वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे हे ओळखून हळदीकुंकवासाठी येणाऱ्या महिलांना संस्थेकडून वाण म्हणून वृक्ष भेट देण्यात आले.

त्याचबरोबर समाजात विधवा महिलांना वागणूक देताना जुन्या रूढी व चालीरीतीची परंपरा अजूनही कायम आहे. त्याला कुठेतरी शिक्षित महिलांनी समोर येऊन रोखले पाहिजे म्हणूनच मातोश्री फाउंडेशन च्या वतीने विधवा महिलांना हळदी कुंकवाला आमंत्रित करून त्यांची ओटी भरण्यात आली.
समाजात महिलांनी अशा प्रकारचे उपक्रम राबवावे असे मत मातोश्री फाउंडेशनच्या तालुकाध्यक्ष गीता ताई गुल्हाने यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे आयोजन सौ शुभांगी ताई भुजाडणे सौ राखीताई भुजाडणे सौ जयश्रीताई वानखडे, ताराबाई चव्हाण, सौ रंजनाताई श्रीरामे, सौ नलिनीताई टाले अध्यक्ष पेठ रघुनाथपूर मातोश्री फाउंडेशन, तसेच मंगरूळ दस्तगीर येथील प्रत्येक वार्डाच्या सर्व मातोश्री फाउंडेशनच्या अध्यक्ष यांनी केले

Laksh

Google Ad