धामणगाव रेल्वे –
अश्विन नवरात्री सर्वं भावीकांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. भक्ती आणी श्रध्देचा अनुपम संगम येथील प्राचीन माताजी देवस्थानवर दर्शनासाठी येणाऱ्या भावीकांच्या गर्दीवरुन दिसत आहे.
शहरातील मध्य वस्तीत असलेल्या पुरातन माताजी देवस्थानात चैत्र व अश्विन नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र निमीत्त विवीध धार्मिक अनुष्ठानाचे आयोजन करण्यात आले असून भावीकां तर्फे नवसापोटी ३०१ अखंड दिपज्योत सतत ९ दिवसा पर्यंत लावण्यात आली आहे. सप्तमी ला देवीचा कुंमकुंम अभिषेक करण्यात येईल अष्टमीला होमहवन तर नवमीला महाप्रसादाने नवरात्री उत्सवाची सांगता होईल
मंदीर परिसरात महादेव, भैरवबाबा, शितलामाता, आदींची देवालय असुन मुख्य गर्भगृहात आदी शक्तीची संगमवरवरी मुर्ती असुन आजुबाजुला वैष्णव देवीची झांकी, तर ऐका बाजूला शंकराची पिंड देखावा म्हणून ठेवली आहे दररोज सकाळी कन्या भोजन मध्ये शेकडो बालीकांना भोजन देण्यात येते तर पहाटे होणार्या मंगलाआरतीला पंचक्रोशीतील शेकडो महिला भगीनी दुरदुरुन चालत येऊन सहभागी होतात
उत्सवाच्या यशस्वीतेसाठी पुजारी पप्पु महाराज सह शेकडो भक्त परिश्रम घेत आहे