धामणगाव रेल्वे
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वत:च्या प्राणाची आहुती देण्याऱ्या भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या स्मरणार्थ देशभरात शहीद दिवस साजरा केला जातो. श्री दत्ताजी मेघे बाल कल्याण शिक्षण संस्था द्वारा संचालित स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये शहीद दिवस साजरा करण्यात आला .
या कार्यक्रमाची सुरुवात शहीद ए आजम सरदार भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. सर्व शिक्षकांनी सरदार भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन केले. व त्यांना आदरांजली अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका के साई नीरजा आणि ग्रीन हाऊस सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले . सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आणि कार्यक्रम यशस्वी केला.