आर्वी, प्रतिनिधी /पंकज गोडबोले
आर्वी : तळेगाव मार्गाने आर्वीकडे येणाऱ्या प्रवासी ऑटोला टाटा एसच्या चालकाने धडक दिल्याने ऑटो अनियंत्रित होवून सुरुवातीला झाडाला आदळला. त्यानंतर लगतच्या नाल्यात उलटून अपघात घडला. हा अपघात दि. १७ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास घडला. या अपघातात तीन प्रवासी गंभीररित्या तर ४ जण किरकोळ जखमी झाले. गुलाम शहा अजीज शहा (वय ५३), शकिला बानो गुलाम शहा (वय ४९), वैशाली कौरती सर्वरा. तलेगाव असे गंभीररित्या जखमी तर अर्शिया शहा शब्बीर शहा (वय ३०), राणी गुलाम शहा (वय २५), अशब शहा शब्बीर शहा ३ वर्ष, अबिया शहा शब्बीर शहा ३ महिने असे जखमीची नाव आहे. ऑटो चालक गुलाम शहा हा आपल्या मालकीचा प्रवासी ऑटो (क्रमांक MH 32AK-895) तळेगाव मार्गाने प्रवासी घेवून आर्वी कडे येत होता. अचानक अज्ञात टाटा एसच्या चालकाने डॉक्टर
कॉलनीकडून येवून ऑटोला धडक दिली. व यात ऑटो अनियंत्रित झाला आणि झाडाला धडकला त्यानंतर लागून असलेल्या नाल्यात घुसल्याने. यात ऑटो चालकासह तीन व्यक्ती गंभीर जख्मी झाले. चार जणांना किरकोळ मार लागला तसेच आर्वीतील सामाजिक कार्यकर्ते रामू राठी व रोहन हिवाळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तेथून काढण्यास मदत केली व उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आले व काही व्यक्ती गंभीर जखमी असल्यामुळे पुढील उपचाराकरिता अमरावती येथील रुग्णालय येथे पाठविण्यात आले. रमजू शहा बब्बू शहा यांच्या फिर्यादी वरून अज्ञात टाटा एस च्या चालाकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार नीरज लोही करीत आहे.