धामणगांव रेल्वे | १६/०१/२०२६
स्कूल ऑफ स्कॉलर्स, धामणगांव रेल्वे येथे मकरसंक्रांत हा पारंपरिक सण शैक्षणिक व सांस्कृतिक वातावरणात उत्साहपूर्वक साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात विद्येची आराध्य दैवत माता सरस्वतीच्या पूजनाने करण्यात आली.
यावेळी इयत्ता सातवीचे विद्यार्थी तनय खेतान व रिधिमा वानखेडे यांनी मकरसंक्रांतीच्या सामाजिक, सांस्कृतिक व वैज्ञानिक महत्त्वावर अभ्यासपूर्ण भाषणे सादर केली. त्यांच्या सादरीकरणातून सणाचे महत्त्व प्रभावीपणे मांडण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या श्रीमती प्रचिती धर्माधिकारी उपस्थीत होत्या. यांनी ” सूर्याच्या उत्तरायण प्रवासाचे वैज्ञानिक महत्त्व, सकारात्मक विचारांचे महत्व व मूल्याधिष्ठित शिक्षण यावर त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले”.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदी शिक्षिका चंचल इंगोले यांनी प्रभावीपणे केले, तर आभारप्रदर्शन इंग्रजी शिक्षिका वनिता झाडे यांनी केले.
“ तिळगुळ घ्या, गोड गोड बोला” या संदेशातून सामाजिक सलोखा, आपुलकी व सद्भावनेचे महत्व अधोरेखित करण्यात आले. या उपक्रमामुळे संपूर्ण शाळा परिसर आनंदी व संस्कारमय वातावरणाने भारावून गेला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंद, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. उपस्थितांनी कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले.














