तलेगांव दशासर।।ठानेदार रामेश्वर धोंडगे हे तळेगाव दशासर पोलीस स्टेशन येथे सवा दोन वर्ष येथे कार्यरत होते व त्यांची चांदुर रेल्वे ला बदली झाली होती व नुकतीच त्यांची नांदेड येथे बदली झाल्यामुळे, त्यांना सपत्नी निरोप देण्याकरिता व त्यांनी तळेगाव दशासर ला दिलेल्या उत्कृष्ट सेवेची दखल घेत, स्थानिक कृषक सुधार मंडळ,तळेगाव दशासर व शंकरपट व्यवस्थापन समिती तळेगाव यांच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची प्रतिमा व ग्रामगीता भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जुन्या आठवणींना उजाळा देताना उपस्थित सर्व जण भावुक झाले होते…..!
या प्रसंगी कृषक सुधार मंडळाचे सचिव श्री आनंदराव शि. देशमुख, सदस्य श्री रविकांत चुटे, श्री माणिक बगाडे, श्री पोमेश थोरात, सागर अवचट तसेच पत्रकार उपस्थित होते।