माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा

0
48
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे ,

आई जिजाऊंनी शिशु अवस्थेपासून दिलेल्या शिकवणीतून देव,देश,धर्म, राष्ट्रभक्ती,राष्ट्रशक्ती, आचार विचार ,संस्कार,संस्कृति, ज्ञान,चारित्र्य ,एकता या सर्व गोष्टीं सोबतच हिंदूंचे होत असलेले पतन थांबविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य आपल्या शौर्यातून हिंदवी स्वराज्याची स्थापना करून छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले असे प्रतिपादन पत्रकार कमल छांगाणी केले 

ते माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्यात lबोलत होते याप्रसंगी मंचावर माजी सैनिक संघटनेचे संस्थापक दिलीप दगडकर,प्रा.विशाल मोकाशे कार्याध्यक्ष हरीश मलबार, 1971 चे वार हिरो सुदामा सरोदे ,प्रा.विशाल मोकाशे, छत्रपतींच्या भूमिकेतील आयूश वाघमारे, प्रामुख्याने उपस्थित होते सर्वच धर्मातील जनतेचे रक्षण हा मूळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून मुघलांच्या काळात हिंदूंचे धर्मांतरण, पतन आणि हिंदूंचे संरक्षण करण्याकरिता छत्रपतींनी मुघलांसोबत अनेक युद्ध केलेत शिवाजी महाराजांच्या या शौर्य मुळेच हिंदू टिकून राहिला अन्यथा मुघलांनी समस्त हिंदूंना इसवी १६०० मध्येच केव्हाचेच धर्मांतरित केले असते त्यामुळे शिवाजी महाराजांची शौर्यगाथा स्मरणात ठेवणे गरजेचे आहे शिवाजी महाराजांच्या काळाप्रमाणे बिकट परिस्थिती नसली तरी आजही हिंदू करिता मार्ग खडतर आहेच छांगाणी म्हणाले आई जिजाऊंनी ज्या प्रमाणे छत्रपतींना रामायण,महाभारत, उपनिषद,गीता व राष्ट्रभक्तीचे धडे शिशुअवस्थेपासूनच दिले त्याचप्रमाणे हुतात्मा भगतसिंगांची आई विद्यावतीने सुद्धा शिशुअवस्थेपासूनच भगतसिंगांना राष्ट्रभक्तीचे शिक्षण दिलेत राजे शंभू सोबतच गुरु गोविंद सिंहाची दोन मुल हिंदू धर्माकरिता हुतात्म्या झालेत गुरुगोविंद सिंहाच्या दोन्ही मुलांना जोरावर सिंह व फत्तेसिंह यांना मुघलांकडून भिंतीत कोंबुन मृत्यू देण्यात आले राजे शंभू यांची जीप कापली गेली डोळ्यांमध्ये तापत्या सळाखा खूपसल्या गेल्यात त्यांच्या शरीराचे एक एक अंग छाटण्यात आले गेले इतक्या अत्याचारानंतरही या शूरवीरांनी आपला धर्म सोडला नाही त्यामुळे छत्रपतींची जयंती साजरी करतांना या गोष्टींचा विसर पडता कामा नये महाराजांची जयंती साजरी करतांना संकल्प करू या की आमच्या हृदयात राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रशक्ती आजीवन पेटत राहील उपरोक्त प्रसंगी सौ.दगडकर यांनी महाराजांच्या जीवन पटावर पोवाडा सादर केला सौ. बुटले यांनी विचार व्यक्त केले एसओएस च्या बाल कलाकारांनी सुद्धा कला शिक्षक देवघरे यांच्या नेतृत्वात पोवाडा सादर केला प्रास्ताविक प्रा.विशाल मोकाशे संचालन वर्षाताई दारवेकर आभार हेमंत पडोळे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाला सचिव नरेश इंगळे माजी सैनिक पुरुषोत्तम बडीये, जगदीश महाजन, जितेंद्र मिरगे , किशोर ठाकरे सुनील राऊत,श्री नगराळे, दिनेश ठाकरे, गोपाल मोकळकर, राहुल कुकडे रामदास हाडे पुंडलिक कडव वसंतराव भोंडे, यांच्या सह महिला हजर होत्या,

veer nayak

Google Ad