माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

0
25
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे येथील माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षीचे ध्वजारोहण कॅप्टन प्रदीप जी मडावी यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख पाहुणे मतदारसंघाचे आमदार श्री प्रताप दादा अडसड, तहसीलदार श्री अभिजीत घोरपडे, व इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

 

अनेक वर्ष भारत मातेची सेवा करून निवृत्त झालेले माजी सैनिक धामणगावात सुद्धा आपली देश सेवा, समाज सेवा अशीच अविरत सुरू ठेवत आहे. कार्यक्रमात सन्माननीय व्यक्तीचा सन्मान करण्यात आला, तसेच आर्टिस्ट कराओके ग्रुप व स्कूल ऑफ स्कॉलर चे विद्यार्थी धामणगाव रेल्वे यांच्याकडून देशभक्तीपर गीत गायन सादर करण्यात आले.यावेळी बहुसंख्य माजी सैनिक व माजी सैनिक पत्नी या कार्यक्रमाला उपस्थित होते.माजी सैनिक बहुद्देशीय संस्थे मार्फत सैनिक पत्निनी महिला बचत गटांची सुद्धा स्थापना करण्यात आलेली आहे,या द्वारे सैनिक पत्नी महिला मोठ्या प्रमाणात सैनिक पत्नी सक्षमीकरण सुद्धा होत आहे.देशसेवा करतांना जसा आदर व प्रेम सामान्य लोकांकडून मिळते तसेच सैनिक निवृत्ती नंतर सुद्धा लोकांचे सहकार्य मिळत राहावे,कारण “भारताचा जवान हा कायम जवान असतो,त्याचे देशप्रेम थोडेही कमी होत नसते, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ माजी सैनिक बाबूलाल मेश्राम यांनी दिली.

veer nayak

Google Ad