महेश पांडे यांच्याकडे जन्माष्टमी उत्सव

0
0
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे,

मागील तीस वर्षापासून आपल्या स्वतःच्या निवासस्थानी काकाजी रेस्टॉरंट चे संचालक महेश पांडे यांच्याकडील जन्माष्टमी उत्सव इतका सुंदर असतो की पुढील दहा दिवसापर्यंत जन्मोत्सवानिमित्त करण्यात आलेल्या सजावट व देखाव्यांना पाहण्याकरीता जणू पांडे लेआउट मध्ये रीघ लागलेली असते 

येथील पांडे लेआउट मधील पांडे कुटुंबामध्ये मागील ३० वर्षापासून श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव खूप उत्साहाने आणि एक महिन्याच्या पूर्वीपासून तयारीने करण्यात येतो दरवर्षी भगवान श्रीकृष्णाच्या आणि राधा राणीच्या वेगवेगळ्या झाक्यांनी सजवलेली सजावट आकर्षक असते विशेष म्हणजे ही सजावट पांडे कुटुंबीयातील महेश पांडे त्यांची पत्नी सौ.भावना व मुलगा आर्यन हे स्वतःच करतात सजावटीमध्ये जुन्या काळातील वस्तूंचा वापर केला जात असल्यामुळे सुद्धा पाहणाऱ्यांकरीता या वस्तू विशेष आकर्षण ठरतात

राधा कृष्णाच्या अफाट भक्तीने परिपूर्ण असलेले पांडे कुटुंब श्रीकृष्ण सजावटी करिता खूप उत्साहीत आणि आतुर असतो 

………………………….

शहरातील लोक येतात पाहायला….

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त इतकी सुंदर आणि अलौकिक अशी सजावट असते त्यामुळे संपूर्ण गावातील शेकडो लोक पांडे कुटुंबियांकडे ही सजावट बघायला येतात सर्वांकरीता सदर सजावट पाहायला खुली असते हे येथे उल्लेखनीय

सजावट बघायला आलेल्या प्रत्येकाला महेश पांडे या कुटुंबीयांकडून त्यांची पत्नी सौ.भावना व मुलगा आर्यन राधा राणी संबंधित एक भेट आणि भरपूर असा प्रसाद स्व:हस्ते प्रदान करतात

veer nayak

Google Ad