महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कुटुंबप्रमुख पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त माताजी मंदिर येथे महाआरती करण्यात आली.

0
4
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कुटुंबप्रमुख पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) धामणगाव रेल्वे तालुका व शहर च्या वतीने धामणगाव रेल्वे येथील माताजी मंदिर येथे महाआरती करण्यात आली आणि देवी समोर नतमस्तक होऊन उद्धव साहेबांना उदंड, निरोगी, दीर्घ आयुष्य प्रदान करो अशी प्रार्थना करण्यात आली. तसेच वृक्षरोपण व शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे जाऊन रुग्णांना फळ वाटप करून त्यांची सेवा करण्यात आली. यावेळी अमरावती जिल्हाप्रमुख मनोजभाऊ कडू तसेच तालुका प्रमुख नानाभाऊ देऊळकर, शहर प्रमुख गोपालभाऊ मोकलकर , तालुका संघटक निलेश मुंदाने, शहर संघटक डॉ.अशोकभाऊ कुचेरिया, सुरेशभाऊ जुनघरे उपतालुकाप्रमुख,दीपक कुंमरे उपतालुकाप्रमुख,संतोषभाऊ गावंडे उपशहर प्रमुख, रवी काटणकर उपशहर प्रमुख, नंदू डुकरे विभाग प्रमुख, अतुल चौधरी विभाग प्रमुख, माजी युवासेना तालुकाप्रमुख आशिष गावंडे, धर्मेंद्र क्षीरसागर, मनीष गोपाळ, स्वप्नील कोंबे, हरीशभाऊ पनपालीया, राहुल ठाकरे, प्रशांत शिंदे, अंकुश वानखडे,मधुर पालीवाल, प्रतीक ढोमणे,सागर गुल्हाने, निखिल कपिले आदी शिवसैनिक उपस्थित होते उपस्थित होते.

veer nayak

Google Ad