महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ मार्फत केंद्र संचालक गजानन सोनटक्के यांनी कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम कला महाविद्यालय येथे केले, कार्यक्रमाची प्रास्ताविकता केंद्र संचालक सोनटक्के यांनी केले मान्यवराचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य नंदकिशोर राऊत तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या (सामाजिक न्याय विभाग अंतर्गत) सौ सरोजताई आवारे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या सौ वंदना पाळेकर, घनश्याम पणपालिया, राजेंद्र पाळेकर, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ मार्फत राबविण्यात येणारा उपक्रम ताण तणाव व्यवस्थापन याचा उद्देश विद्यार्थी जीवनातील ताण तणाव कमी होऊन ताणतणाव व्यवस्थापन कशा पद्धतीने करावे. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक लाभलेल्या (सामाजिक न्याय विभाग अंतर्गत) सरोज ताई आवारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या विद्यार्थी जीवन जगत असताना ताण तणाव व्यवस्थापन करणे गरजेचे आहे मनातील ताण कमी करण्यासाठी कुठेतरी व्यक्त होणे गरजेचे आहे, जीवनात एक तरी मैत्रीण अशी असावी की जिथे आपण मनातील ताण व्यक्त करू शकतो.
ताण एवढाच घ्या की त्याचा विपरीत परिणाम आपल्यावर होऊ नये असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना सरोज आवारे यांनी केले , तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या वंदना पाळेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ताण तणाव कमी करण्यासाठी योगा करणे अतिशय गरजेचे आहे असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले, राजेंद्र पाळेकर घनश्याम पंतलिया यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य नंदकिशोर राऊत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवनात प्रत्येक व्यक्तीला ताण-तणाव असतो , विद्यार्थ्यांनी ताणतणावात न जगता अभ्यासाची नियोजन परीक्षेच्या आधीपासून केले तर ताण तणाव हा कमी प्रमाणात येणार. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केंद्र संचालक सोनटक्के यांनी केले कार्यक्रमाला उपस्थित महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, प्राचार्य नंदकिशोर राऊत, मुख्याध्यापीका अर्चना राऊत, केंद्र संचालक गजानन सोनटक्के, सामाजिक न्याय विभाग अंतर्गत सरोज आवारे, वंदना पाळेकर राजेंद्र पाळेकर घनश्याम पलपलिया प्राध्यापक बिरे सर, कुलकर्णी सर,दौड सर,इंगळे मॅडम , व महाविद्यालयातील विद्यार्थिनी. अशा उपक्रमांची गरज युवा पिढीला गरजेची आहे