महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनातर्फे दिव्यांग कर्मचारी होणाऱ्या अन्यायाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन.

0
40
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना (शासन मान्यता प्राप्त) अमरावती तर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिव्यांग कर्मचारी होणाऱ्या अन्याय बाबत निवेदन देण्यात आले आहे. 

सर्व टाकून विभागातील सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांना तात्काळ दिव्यांग भत्ता, सहाय्यक उपकरण व दिव्यांग पदोन्नतीमध्ये प्रथम प्राधान्य देऊन सोईच्या ठिकाणी बदली देण्यात यावी व दिव्यांगांवर पदोन्नतीमध्ये अन्याय होणार नाही (दिव्यांग कायदा अधिनियम कलम 20) याबाबत निवेदन देण्यात आली आहे. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी नियमानुसार कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

 यावेळी शासन मान्यताप्राप्त महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना विद्युत विभाग अध्यक्ष विलास शिंदे आरोग्य विभागाचे अध्यक्ष सुभाष चव्हाण प्रशांत शिंदे देवकुमार ऑर्डक महिला कार्याध्यक्ष करुणा बनसोड सुनीता मेश्राम श्वेता पाटील वर्षा राठोड अर्चना मैदानकर ललिता मेश्राम स्मिता डोके उपस्थित होते 

या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री सचिवालय मुंबई दिव्यांग मंत्रालय मुंबई दिव्यांग आयुक्त पुणे यांना ईमेलद्वारे पाठवण्यात आलेली आहे. 

विलास शिंदे अध्यक्ष 

महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना शासन मान्यता प्राप्त विद्युत विभाग अमरावती.

veer nayak

Google Ad