जिल्हा प्रतिनिधी : पवन पाटणकर
शिराळा : स्थानिक शिराळा येथील शिवसेना अमरावती तालुका प्रमुख मंगेशभाऊ काळमेघ यांच्या नेतृत्वात शिवसेना शिराळा शाखा तर्फे सावंगा येथील प्रसिद्ध आसारा माता मंदिर येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाआरतीचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्ताने शिराळा येथील सर्व शिवसैनिककांनी सकाळी 9 वाजता सावंगा येथील आसरा माता मंदिरामध्ये उपस्थित राहून महाआरती मध्ये सहभाग घेतला.
सर्वप्रथम आसरा मातेचे यथासांग पूजन अमरावती तालुकाप्रमुख मंगेश काळमेघ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सर्व शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी पूजन केले व महाआरतीला सुरुवात केली. व माननीय श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उज्वल भविष्यासाठी सर्व शिवसैनिकांनी आसरा मातेला प्रार्थना केली. यावेळी उपस्थितांमध्ये अमरावती तालुका प्रमुख मंगेशभाऊ काळमेघ, शिवसेना मीडिया प्रमुख रितेश देशमुख, शिवसेना शिराळा शाखा प्रमुख वैभव मुंदाणे, शाखा संघटन निलेश कुकडे, युवाशक्ती ग्रामविकास संघटनेचे उपजिल्हाप्रमुख पवन पाटणकर, शिवसेनेचे निलेशभाऊ रिठे, विजयराव कडू,रमेशराव कडू,नवनीतभाऊ उमेकर – ग्रामपंचायत सदस्य सावंगा आसरा, वैभव डवरे, आदित्य ढोके, नवनीत घोंगडे, वैभव ठाकरे, अजिंक्य उमेकर,दिनेश पेठे, सुरेंद्र पेठे, सार्थक टोम्पे,गौरव नागपुरे,उपशाखा प्रमुख स्वप्नील जीभकाटे, सचिव अर्पित नवरंगे, सहसचिव भूषण पाटणकर, कोषाध्यक्ष कैलास मानकर,संकेत जीभकाटे, आशिष बांबल, रोशन पाटणकर,रितेश घुरडे, अनुप पटले, भूषण पटले,हर्षल मस्के, शुभम वाडेकर,वेदांत कडू, तेजस टोम्पे, अक्षय कावरे, सुरेश गंधे, प्रफुल कडू, सौरभ देशमुख, सतीश पटले, राजेश कुकडे, स्वराज मानकर, जय देशमुख, ओम देशमुख, सुरज उके, अमोल जवंजाळ, प्रतीक कोल्हे, इतर मोठ्या संख्येने शिवसैनिक व भाविक भक्त महाआरतीला उपस्थित होते.