राज्याच्या या सांस्कृतिक विभागातील महत्त्वपूर्ण निवडीबद्दल सोपानदादा कनेरकर यांचे सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.
धामणगाव रेल्वे,
ध्येयवेडा तरुण म्हणून प्रसिद्ध सोपनदादा महाराष्ट्रात व्याख्यानाद्वारे परिवर्तन घडवतो आहे त्यांच्या व्याख्यानात चाहत्यांची गर्दी त्यांच्या शब्दब्रह्माची किमया दाखवून जाते. आपल्या प्रबोधनातून मुख्यतः विद्यार्थ्यांना ‘भगवद्गीता’द्वारे यशाचा मूलमंत्र युवकांना आवडेल त्या भाषेत सांगण्याचं कार्य कनेरकर करीत आहे नेहमी भारतीय संस्कृतीचा आग्रह करत प्रत्येकांना वृद्धाश्रम ही संकल्पना बंद करण्याचा संकल्प आपल्या विचारातून ते देतात भारतीय संस्कृती, जागर तरुणाईचा, कृष्णनीती, या जगण्यावर शतदा प्रेम करावे, माणूस माझं नाव हे व्याख्यानांनी त्यांनी आपल्या प्रत्येक श्रोत्याच्या हृदयात स्वतःची जागा निर्माण केली आहे गर्दीचे नवनवीन उच्चांक मांडीत महाराष्ट्रात होणारी त्यांची व्याख्यानेच त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष देतात. महाराष्ट्रातील पहिला असा वक्ता आहे जो अश्रू आणि हास्य मधून माणूस घडविण्याचे कार्य आपल्या प्रबोधनातून करीत आहे कनेरकर अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, आदी प्रबोधनात्मक विषयांवर तरुणांसाठी विशेष कार्यशाळा घेत आहेत.