महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, उज्जैन मध्य प्रदेश. (श्री शिवाय नमोस्तुभ्यम समूहाचा उज्जैन महाकालेश्वर देवस्थान येथील दर्शन व प्रवास)

0
0
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आपल्या भारत देशात एकूण 12 ज्योतिर्लिंग असून या बाराही ठिकाणी भगवान शिव शंकराचे वास्तव्य असल्याचे पुराणात सांगितले जाते. शिव स्पर्शाने पावन झालेली हि ठिकाणं आजही पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जातात. आपण भारत देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी तिसऱ्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग म्हणून ओळख असणारे “महाकालेश्वर ज्योतिर्लिंग” हे ठिकाण भारत देशातील मध्यप्रदेश या राज्यात “उज्जैन’ या शहरात स्थित आहे. मोठ्या शहरांपैकी एक असणारे “उज्जैन” हे शहर “क्षिप्रा” नदी किनाऱ्यावर वसलेले आहे. “उज्जैन” हे जागतिक पातळीवर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.”कुंभमेळा” याच शहरात भरतो. महाकालेश्वर मंदिरांचा संपूर्ण इतिहास (history of mahakaleshwar temple) या लेखात लिहला आहे जे वाचूनच मी ही माहिती उज्जैन महाकालेश्वर मंदिराचे दर्शन करून आपल्या पुढे ठेवत आहे. “महाकालेश्वर” मंदिराची पार्श्वभूमी पाहता हे मंदिर अत्यंत प्राचीन काळातील असून या मंदिराची रचना अप्रतिम आहे. हिंदू धर्मातील प्रसिद्ध तीर्थ क्षेत्रापैकी एक म्हणून देशभरात परिचित असणारे “महाकालेश्वर” हे मंदिर “उज्जैन” जिल्ह्यातील “क्षिप्रा” या नदीच्या तीरावर विराजमान आहे. तसेच महाकालेश्वर मंदिराच्या बाजूला “रुद्र सागर” नावाचा तलाव आहे. हे महादेवाचे देवस्थान स्वयंभू प्रकारातील असून हे मंदिर पेशवाई काळात बांधले गेलेले आहे. पूर्वीचे मंदीर इ. स. 1235 दरम्यान इल्तू मिष या दिल्लीच्या मुस्लिम हुकूम शहाने हे मंदिर पूर्णतः उध्वस्त केले होते. यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार इ. स. 1734 ला मराठा साम्राज्याचे सरसेनापती राणोजी शिंदे यांनी पहिले बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वात केला. जवळपास 8 व्या शतकात उज्जैन येथे मराठा साम्राज्य स्थापित झाले. उज्जैन नगरीचा संपूर्ण कारभार पहिले बाजीराव पेशवे यांच्या अधिपत्याखाली होता. नंतर हा कारभार त्यांनी त्यांचे अत्यंत विश्वास असणारे सरसेनापती राणोजी शिंदे यांच्या वरती सोपवला. राणोजी शिंदे यांचे सहकारी रामचंद्र शेणवी हे त्यांचे दिवाण होते. ते खूप श्रीमंत असून त्यांची संपूर्ण संपत्ती त्यांनी धार्मिक कार्यासाठी खर्च केली. त्यामुळे अठराव्या शतकाच्या सुमारास “महाकालेश्वर मंदिर” अत्यंत मजबूत पद्धतीने बांधले गेले. काही वर्षांनी या मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन तसेच बांधकामातील दुरुस्त्या राणोजी रावांचे चिरंजीव “महादाजी शिंदे” यांनी केल्याची इतिहासात नोंद आहे. “महाकालेश्वर मंदीर ” हे अत्यंत सुंदर असून, या मंदिराच्या परिसरात भव्य अंगण आहे तसेच मंदिरा भोवतीचे नैसर्गिक वातावरण अत्यंत मनमोहक आहे. या मंदिराच्या बाबत विशेष म्हणजे या मंदिरातील शिव शंकराची पिंड दक्षिणमुखी असून यामुळेच महाकालेश्वर मंदिरास “दक्षिण मुखी ज्योतिर्लिंग” म्हणून ओळखले जाते. या मंदिराच्या गाभाऱ्यात श्री गणेश, माता पार्वती व कार्तिकी यांच्या प्रतिमा आहेत. तसेच मंदिराच्या समोर नंदीची स्थापना केलेली आहे. मंदीर हे पाच मजली असून पहिला मजला जमिनीखाली आहे. या मंदिरावर नक्षीदार कोरीव “शिल्प काम” करण्यात आले असून, तिसऱ्या मजल्यावर “नाग चांद्रेश्वराची” मूर्ती आहे. पण ही मूर्ती नेहमी दर्शनास उपलब्ध नसते. या मूर्तीचे दर्शन फक्त नागपंचमीच्या पावन मुहूर्तावर होते. या मंदिराच्या गाभाऱ्यात सर्व बाजूंनी दिव्यांचा प्रकाश असतो. महाकालेश्वर या मंदीराची महानता एकूण इथे दर्शनासाठी संपूर्ण भारतातील अनेक राज्यातून भाविक येत असतात. महाशिवरात्रीच्या पर्वकाळात या ठिकाणी अत्यंत गर्दी असते. आणखी एक विशेष उज्जैन येथे कुंभमेळा भरतो. त्या काळात सुद्धा अनेक भाविक भक्त उज्जैन येथे येत असतात, दर आठवड्यातील सोमवार, श्रावण महिना तसेच भाद्रपद महिन्याच्या काळात या ठिकाणी भाविकांची अचाट गर्दी होत असते. श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी महाकालेश्वर येथे दिव्य पालखी सोहळा असतो. शाही सावरी नामक पालखीतून भगवान “महाकाल” यांची मिरवणूक काढण्यात येते, या उत्सवात देखील अनेक भाविक सहभागी होतात.

भक्तांच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या या विशेष अश्या “महाकालेश्वर” मंदिराचे वैभव अत्यंत महान आहे. या मंदिराचे वर्णन अनेक पुराणात केलेले आहे. श्री व्यास ऋषी पासून तर कवी कालिदास, राजा भोज तसेच बनभट्ट यांसारख्या महान विभूतीनी मंदीराचे महत्व आपल्या लेखणीतून वर्णिले आहे. “महाकालेश्वर” हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून, हे एक ज्योतिर्लिंग व “शक्तीपीठ” म्हणून सुद्धा ओळखले जाते. देशातील 18 महाशक्ती पीठांपैकी एक असा या मंदिराचा उल्लेख केला जातो. जेव्हा भगवान शिव शंकराने आपल्या “सती” नामक पत्नीचे प्रेत घेऊन रागाच्या भरात प्रचंड मोठा तांडव केला. तेव्हा त्यांच्या पत्नीच्या शरीराचे 51 तुकडे या पृथ्वीवर पडले. या सती मातेच्या शरीराच्या तुकड्यापैकी त्यांचे ओठ या ठिकाणी पडल्यावर त्या ओठांच्या तुकड्यात माता भगवती यांनी स्वतः प्रवेश केला. तेंव्हापासून येथे “महाकाली” हे शक्तिपीठ उदयास आले. शिव पुराणात या महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे वर्णन आले असून, याबद्दलची कथा देखील सांगितलेली आहे. या कथे नुसार एकदा श्रीविष्णू, भगवान शंकर, तसेच सृष्टी निर्माते ब्रह्मदेव हे तिघे एकत्रित गप्पा मारत बसले असता, महादेवाच्या मनात एक विचार आला त्यांनी श्री विष्णू व ब्रह्मदेवाची परीक्षा घ्यायचे ठरवले. या कारणास्तव शंकरांनी त्या दोघांना सृष्टीतील प्रकाशाचा एक स्तंभ देऊन प्रकाशाचे अंतिम टोक कुठे आहे ? असा प्रश्न विचारला. हे अंतिम टोक शोधण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला. परंतु त्यांना या टोकाचा काही शोध लागला नाही. त्यामुळे त्या दोघांपैकी शेवटी थकून श्री विष्णू देवाने महादेवा पूढे आपली हार मानून ते शांत बसले. परंतु मला या प्रकाशाचे अंतिम टोक सापडले, असा खोटा दावा ब्रम्ह देवांनी केला. हे ब्रम्ह देवाचे खोटे उत्तर एकूण भगवान शंकराचा राग अनावर झाला, व त्यांनी ब्रह्म देवास शाप दिला. ते ब्रम्ह देवास म्हणाले की तूम्ही जरी या सृष्टीचे निर्माते असला, तरी सुद्धा आजपासून या पृथ्वीतलावर तुमची पूजा कोणीही करणार नाही. या जगतात फक्त श्री विष्णूची पूजा केली जाईल. हा शाप एकूण ब्रम्ह देवांनी शिव शंकर यांना माफी मागितली. आणि ते म्हणाले माझी चूक झाली त्यामुळे मला या शापातून मुक्त करा. ही ब्रह्म देवांची विनंती पाहून भगवान शंकर त्या स्तंभात स्वतः प्रगटले. पुढे याच स्तंभाचे शिवलिंग निर्माण होऊन तेच आज “महाकालेश्वर ज्योतिर्लिंग” म्हणून उदयास आले. याच महाकालेश्वर शंकरास “महाकाल” म्हणून ओळखले जाते. हेच महाकाल “उज्जैन” नगरीचा राजा या नावाने प्रचलित आहे.

!! जय महाकाल !!

वैभव मीनाक्षी सुभाषराव देशमुख
मो.क्र.- 9665796124

veer nayak

Google Ad