दिनांक 18/06/2025 रोजी संध्याकाळी 7.00 वाजता स्थानिक खोलापुरी गेट पो. स्टे.अम.येथे नव्याने रुजू झालेले ठाणेदार साहेब मा.श्री.दिलीप वडगावकर PI साहेब व एपीआय मिनाक्षी बोचे मॅडम यांचे खोलापुरी गेटच्या शांतता सुरक्षा समिती खोलापुरी गेट व समितीच्या सदस्य यांच्या वतीने शाॅल व बुके देऊन नवनियुक्त ठाणेदार सरांचे सन्मान पूर्वक स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी आयुक्तालय व खोलापुरी गेट पोलीस स्टेशनच्या उपस्थित सदस्यांचे नावे.श्री.सतोष पिढेकर,श्री.राजु पिजंरकर, सौ.जया दि बद्रे.सौ.रेखा काटोळे,लता सोढा,सौ.कल्पाना विगे,सौ.श्रद्धा वर्मा,सौ.वंदना गुलालकरी,सौ.ज्योती बेले,व इतर महिला सदस्य उपस्थित होत्या.
उपस्थित समिती महिला सदस्य व पोलीस मित्र यांच्याशी ठाणेदार साहेबांनी सविस्तर चर्चा करून परिसरातील घडलेल्या घटनांक्रमाचा आढावा घेतला. सर्वांनी मा.ठाणेदार साहेबांचे खूप खूप अभिनंदन केले.