पुलगाव
स्थानिक आर के ज्ञान मंदिरम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भारतीय असंतोषाचे जनक आणि प्रखर स्वातंत्र्यसैनिक लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि साहित्यरत्न व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती
साजरी करण्यात आली. यावेळी एका विशेष परिपाठाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. उपस्थित सर्वांनी लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नितीन श्रीवास, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक नितीन श्रीवास यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन समिती, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले