लॉयन्स क्लब आर्वी व राणे मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिर

0
36
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

दरवर्षीप्रमाणे रक्तदान व नेत्ररोग निदान व मोफत मोतियाबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी : येथे दि.१० सप्टेंबर २०२५ रोजी आयनाॅक्स हाॅल मधे लायन्स क्लब आर्वी व राणे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य नेत्ररोग निदान, मोफत मोतीयाबिंदू शस्त्रक्रिया व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये नेत्ररोग तपासणी करून मोतीयाबिंदू धारकांना शस्त्रक्रियेसाठी त्याच दिवशी दि. १० सप्टेंबर २०२५ ला ४ वाजता सेवाग्राम येथे पाठवण्यात येणार आहे तरी सर्व इच्छुक मोतीयाबिंदू धारकांनी व रक्तदात्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा ही विनंती. या भव्य रक्तदान शिबिरामध्ये इच्छुक रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र व आकर्षक भेटवस्तू देवुन सन्मानित करण्यात येणार आहे.

स्थळ :- आयनॉक्स हॉल राणे हॉस्पिटल साईनगर, आर्वी.
येथे दि. १०/०९/२०२५ ला
वेळ :- सकाळी १० ते दुपारी २ वाजे पर्यंत राहील सर्व रक्तदात्यांनी याची नोंद घ्यावी…!
नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क.. माे. ९४२२१४४९३६

veer nayak

Google Ad