धामणगाव रेल्वे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आ प्रताप अडसड यांच्या प्रयत्नामुळे जिल्ह्यातील इतर तालुक्यापेक्षा धामणगाव विधानसभा मतदार संघातील तिन्ही तालुके अव्वल ठरले असून प्रशासनाकडे तिन तालुक्यात ऑनलाईन तब्बल ६५ हजार २१७ अर्ज प्राप्त झाले आहे
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ सर्वसामान्य भगिनींना मिळावा ,
या योजनेत महिलाना पात्र होण्यासाठी येणा-या विविध समस्या त्वरित सोडवून जास्तीत जास्त महिलांना याचा फायदा कसा देता येईल यासाठी आमदार प्रताप अडसड यांनी धामणगाव रेल्वे, चांदुर रेल्वे ,नांदगाव खंडेश्वर या तिन्ही तालुक्यात स्वतः युवक व युवतींचे स्वतंत्र पथक नेमले. सदर टीम तिन्ही तालुक्यात गावागावात प्रत्येक महिलांच्या घरी जाऊन निशुल्क ऑनलाईन अर्ज भरून घेत आहे आतापर्यंत धामणगाव रेल्वे,२१ हजार१९९, चांदुर रेल्वे १५ हजार २७८,नांदगाव खंडेश्वर २८ हजार ७४० अशा तीन तालुक्यात सर्वाधिक ६५ हजार २१७ ऑनलाईन अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले आहे.
लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात लवकरच जमा होणार असून सध्या या प्रक्रियेने वेग घेतला आहे. आता काही निवडक महिलांच्या खात्यात प्रायोगिक तत्त्वावर तालुका प्रशासनाने एक रुपया बँक खात्यात जमा केला जात असून हा तांत्रिक प्रक्रियेचा तथा पडताळणीचा भाग यशस्वी झाला आहे
दरवर्षी रक्षाबंधन व भाऊबीजेला आपल्या घरी येणाऱ्या भावाप्रमाणेच आ. प्रताप अडसड या योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याने आमदार प्रताप अडसड यांचे भगिनी कडून आभार व्यक्त होत आहे
लाडक्या बहिणींनी या योजनेसाठी निधी वगैरे नसल्याच्या अपप्रचाराला व गैरसमजाला बळी पडू नये
लवकरच पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार असल्यामुळे
अर्ज भरण्यासाठी ऑगस्ट अखेर पर्यंतची मुदत असली तरी ज्या बहिणींचे अर्ज भरण्याचे राहिले असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून घ्यावे. असे आवाहनही आ प्रताप अडसड यांनी केले आहे