धामणगाव रेल्वे,
कृष्णावतार श्री रामदेव बाबांचे परमभक्त असलेले ६ युवक धामणगाव ते रामदेवरा (राजस्थान) पर्यंतच्या चौदाशे किलोमीटर सायकलने प्रवासा करिता निघालेत धाडसी आणि ध्येयवादी असलेल्या या युवकांचे अमर शहीद भगतसिंग चौकातील श्री रामदेव बाबा मंदिर येथील ट्रस्टी विजयप्रकाश भैय्या व पंडित दुलीचंद महाराज छांगानी यांनी स्वागत करून पुढील प्रवासाकरिता शुभेच्छा दिल्यात
ऋणीचा चे राजा (रामदेवरा) श्री रामदेव बाबा यांचे परम भक्त करण उपाध्याय, सागर चौधरी, करण शेंडे, रोहित शर्मा, प्रणित खंडाते, वैभव कोहरे या युवकांनी बुधवारी सकाळी श्री रामदेव बाबा मंदिर येथे बाबांचे दर्शन व पूजा अर्चना करून धामणगाव ते रामदेवरा सायकल यात्रेला प्रारंभ केले
सदर युवकांची सायकल यात्रा पंधरा दिवसाची असून २९ किंवा ३० ऑगस्ट पर्यंत हे युवक रामदेवरा येथे पोहोचतील असा अंदाज आहे
………………………………..
युवकांचे धाडस व ध्येय…
धामणगाव ते रामदेवरा हा १४०० किलोमीटरचा प्रवास करण्याचा निश्चय या युवकांनी मागील एक महिन्यापूर्वी पासून केलेला होता परंतु सध्या मुसळधार पाऊस असल्यामुळे हे युवक प्रवास रद्द करून पुढे कधी तरी जातील असा अंदाज असतानाच या मुलांनी बुधवारी भर पावसात आपली ही सायकल यात्रा निश्चित केल्याप्रमाणेच प्रारंभ केल्याने या धाडसी व ध्येयवादी युवकांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे