एस ओ एस कब्स बुधवार बाजार रोड धामणगाव रेल्वे येथे कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी.

0
38
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

मा. श्री दत्ताजी मेघे बालकल्याण शिक्षण संस्था द्वारा संचालित एस ओ एस कब्स येथे कृष्ण जन्माष्टमी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली . नर्सरी चे विद्यार्थी कृष्ण आणि राधा च्या वेशभूषेत तर के जी १ व के जी २ चे विदयार्थी पारंपरिक पद्धतीच्या वेशूषेत आले होते.प्री प्रायमरी हेड माननीय शबाना खान मॅडम यांनी गोपाल कृष्णाच्या प्रतिमेचे पूजन केले तसेच सहायक शिक्षिका श्रद्धा रॉय मॅडम यांनी कृष्ण जन्माची कहाणी सांगितली व नंतर दहीहांडी फोडण्यात आली.सर्वाना काल्याच प्रसाद वाटण्यात आला.कृष्ण जन्माष्टमी निमित्त शाळेत वेगवेगळया प्रकारचे उपक्रम आयोजित करण्यात आले होते. नर्सरी च्या मुलांनी मोर पंख बनविले तर के जी १ च्या मुलांनी मुकुट बनविले. के जी २ च्या विदयार्थीनी कृष्ण लिलेच्या वेगवेगळ्या भूमिका साकारल्या.शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय प्रचिती धर्माधिकारी मॅडम आणि प्री प्रायमरी हेड मा. शबाना खान मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमच्या यशस्वीतेकरिता प्रणिता जोशी, रेणुका सबाने, वर्षा देशमुख, आकांक्षा महल्ले, राणी रावेकर, प्राजक्ता दारूंडे श्रध्दा राॅय, आश्विनी नांदणे यांचे सहकार्य लाभले.

veer nayak

Google Ad