कापूस सधन लागवड करून कपाशीचे भरघोस उत्पादन घेतल्याबद्दल कृषी विज्ञान केंद्र, घातखेड, अमरावती चे संपर्क शेतकरी श्री नामदेव आनंदराव वैद्य निंभोरा बोडखा तालुका धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती यांना केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूर येथे दिनांक १९/०१/२०२५ रोजी डॉ हिमांशू पाठक, सचिव (DARE) आणि महा निदेशक (ICAR), भारतीय कृषी संशोधन परिषद, … नवि दिल्ली, यांचे हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ वाय.जी प्रसाद संचालक, आयसीएआर-सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च. (CICR), नागपूर, डॉ. माई, चेअरमन एएस आर बी, डॉ. एस.के. रॉय, संचालक, ICAR-ATARI, पुणे, श्री गोविंद वैराळे प्रकल्प समन्वयक सी सी आय टी सी डी आर ए महाराष्ट्र, डॉ. एस के शुक्ला, संचालक, आयसीएआर, (सी आय आर सी ओ टी) मुंबई हे उपस्थित होते.
गेल्या दहा वर्षापासून श्री नामदेव आनंदराव वैद्य हे कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात असून कृषी विषयक विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा आपल्या शेतीमध्ये अवलंब करत आहे. कृषी व पशुविषयक निरनिराळे प्रशिक्षण घेऊन उत्तम शेती करण्याचा ठसा व उमटविला आहे आहे. सत्कार मनोगतातून त्यांनी कृषी विज्ञान केंद्र घातखेड अमरावती, कृषी विभाग,अमरावती तसेच आत्मा अमरावती यांचे आभार व्यक्त केले आ