धामणगाव रेल्वे
हिंदू ही जीवन पद्धती आहे भारत माझा मी भारताचा भारताचा कल्याण आणि भारत परमवैभवापर्यंत चे स्वप्न पाहणारा म्हणजे हिंदू आणि म्हणूनच श्री विजयादशमी उत्सव म्हणजे हिंदू संस्कृतिचा पराक्रमाचा इतिहास आहे प्रभू श्रीरामांनी वनवासी बांधवांना एकत्रित करून दृष्ट शक्ती म्हणजेच रावणावर विजय प्राप्त केले श्रीरामांचा तो विजय केवळ रावणावर नव्हे तर अहंकारावर होता त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सामूहिक विजयाचा उत्सव म्हणजेच विजयादशमी उत्सव हिंदू बांधवांच्या एकत्रिकरण आणि शक्ती चा गजर आहे
दुर्बल राहणे गुन्हाच आहे हिंदूंनी सशक्त आणि एकत्रित होऊन राष्ट्र निर्माण कार्यात आपले योगदान देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत सहकार्यवाह अजय नवघरे यांनी येथे व्यक्त केले
हिंदूंचे सशक्तिकरण करणे सुसंस्कृत करणे आणि संघाच्या माध्यमाने राष्ट्र व समाज कार्यकर्ता घडवणे हेच संघाचे मुख्य कार्य आहे असेही ते म्हणाले ते धामणगाव नगरीच्या श्री विजयादशमी उत्सवात बोलत होते
खत्री जिनिंग अँड प्रेसिंग येथे आयोजित संघाच्या श्री विजयादशमी उत्सवामध्ये अमरावती जिल्हा संघचालक विपिनजी काकडे, नगर कार्यवाह चेतन पोळ मंचावर उपस्थित होते.
नवघरे म्हणाले की,हिंदू या शब्दाला सीमित न करता हिंदू हा सार्वभौम शब्द आहे आणि जो राष्ट्रभक्त आहे तो हिंदू आहे अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुद्धा मान्यता आहे शस्त्र पूजनाचे महत्त्व सांगताना ते म्हणाले की शस्त्र स्वतःजवळ बाळगणे म्हणजे केवळ दंगा फसाद करणे नव्हे तर आपल्या प्रत्येक देवाने राक्षसांशी व असुर शक्तींशी युद्ध करताना शास्त्र आणि शस्त्र या दोन्हीचा वापर केलेला आहे त्यामुळे आपणही शस्त्र पूजन करणे स्वसंरक्षणाकरीता आवश्यक आहे संघाच्या शताब्दी वर्षापर्यंत संघाची आता एक मोठी ताकद तयार झालेली आहे देशातच नव्हे तर विदेशातील सुद्धा अनेक प्रकल्पांच्या माध्यमातून संघाचे कार्य चालू आहे हे वर्ष म्हणजे आपल्या राष्ट्राकरिता करिता बलिदान देणाऱ्या गुरु तेगबहादुर यांचे ३५० वी जयंती वर्ष आहे राष्ट्राकरिता प्राणाची आहुती देणाऱ्या गुरु तेगबहादूर यांना हिंदवी चादर म्हणून संबोधल्या गेलेल आहे
२२ जानेवारीला अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर श्रीराम विराजमान आणि प्रयागराज ला ५०% च्या वर श्रद्धाळूंनी पवित्र गंगेचे स्नान करणे म्हणजेच हिंदूंची जागृती झाल्याच दिसतच एप्रिल २०२५ पहलगाम घटनेनंतर ७ जूनला ऑपरेशन सिंदूर करून भारताने आपली शक्ती जगाच्या पाठीवर दाखवून दिलेली आहे असेही ते म्हणाले
अनेक संस्कृति जगाच्या पाठीवर संपली परंतु भारताची हिंदू संस्कृति अजरामर आहे,होती आणि राहील
क्रांतिकारी असलेल्या डॉक्टर हेडगेवार यांनी भारताचे पुढील शंभर वर्षाचे भवितव्य पाहिले होते आणि म्हणूनच आज आपल्याला भारत परम वैभवाकडे पाऊल टाकत असल्याचे दिसत आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आजचा नव्हे तर २०४७ चा भारत डोळ्यासमोर ठेवून कार्य करतो आहे स्वामी विवेकानंदांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाला केवळ १०० युवक मागितले होते ते म्हणायचे की १०० सशक्त युवक जर आपल्या सोबत असतील तर भारताकडे बघण्याची कोणाची वक्रदृष्टी कधीच राहणार नाही नवघरे म्हणाले की जेव्हा जेव्हा आपण हिंदुत्व विसरलो तेव्हा तेव्हा विघटित झालो जागतिक स्तरावर भारतीय सोबतच हिंदू तत्त्वज्ञान म्हणून आपली ओळख असायला पाहिजे
हिंदू समाजाने एकत्रित होऊन समाजातील रावण, कंस सारख्या उपद्रवी आणि आतंकवाद्यांशी संघर्ष पणे उभे राहण्याची काळाची गरज असल्याचेही ते म्हणाले आपल्या एक तासाच्या भाषणात ते भारताच्या प्रगतीवर सुद्धा बोललेत भारत विश्वगुरूपदी आरुढ होणारच असेही ते म्हणाले
———————————– –
उल्लेखनीय पथसंचलन …..
श्री विजयादशमी उत्सवापूर्वी नगरातून शेकडो स्वयंसेवकांची घोष सह उल्लेखनीय पथसंचलन निघाले पथसंचलनाचे संपूर्ण धामणगाव नगरीत पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले
प्रास्ताविक संचालन, परिचय व आभार नगर कार्यवाह चेतन पोळ यांनी केले उत्सवा प्रसंगी स्वयंसेवकांनी प्रात्यक्षिक सादर केले