कावली येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

0
33
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

स्वस्त नारी सशक्त परिवार अंतर्गत कावली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचा शुभारंभ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून मोठ्या उत्साहात करण्यात आला.

या शिबिरामध्ये गावातील महिला, नागरिक तसेच लहान मुले-मुलींचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. शंभरहून अधिक महिलांनी तसेच अनेक बालकांनी आरोग्य तपासणी करून घेतली. मधुमेह, रक्तदाब यासह विविध आजारांची तपासणी करून योग्य मार्गदर्शन व उपचार करण्यात आले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील सरपंच चंदाताई जांभळे, उपसरपंच संदीप इंगळे, डॉ. नारनवरे, समुदाय आरोग्य अधिकारी संदीप दुबे, आरोग्य सेविका वैशाली डोंगरे, प्रतीक्षा कांबळे, आरोग्य सहाय्यक शिंदे साहेब, निवृत्ती गुट्टे, पुनम तायडे तसेच आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व संपूर्ण आरोग्य टीम उपस्थित होती.

अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांच्या वतीने पोषण महिन्याच्या अनुषंगाने महिलांना पोषण आहाराचे महत्त्व सांगण्यात आले. महिलांना योग्य आहार, मुलांच्या आरोग्याची काळजी, तसेच रोग प्रतिबंधक उपाय यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

शिबिराच्या माध्यमातून गावकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग व उत्साह दिसून आला. आरोग्य जनजागृती, तपासण्या व मार्गदर्शनामुळे नागरिकांना प्रत्यक्ष लाभ मिळाल्याने हे शिबिर गावासाठी उपयुक्त ठरले.

veer nayak

Google Ad